शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Mucormycosis : इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे वाढला ब्लॅक फंगसचा फैलाव, एम्सच्या ज्येष्ठ डॉक्टराचा धक्कादायक दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 20:37 IST

Mucormycosis: ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत.

नवी दिल्ली - एकीकडे कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले असतानाच संपूर्ण देशामधून ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस)चे  (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. मात्र आता एम्समधील एका ज्येष्ठ महिला डॉक्टरांनी ब्लॅक फंगसच्या फैलावाबाबत धक्कादायक कारण सांगितले आहे. ( Industrial Oxygen Increases Black Fungus Outbreak, Shocking Claim by Senior AIIMS Doctor Uma Kumar)सुरुवातीला ब्लॅक फंगसचे मुख्य कारण हे स्टेरॉइडचा वापर असल्याचे सांगण्यात येत होते. पण दिल्लीच्या एम्समधील डॉक्टर उमा कुमार यांनी हा आजार पसरण्यामागे इतरही अनेक कारणे असल्याचे सांगितले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनऐवजी इंडस्ट्रियल ऑक्सिजन दिल्यामुळे ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  

तसेच ह्युमिडिफायरमध्ये स्टेरायल वॉटरऐवजी अस्वच्छ पाणी वापरले जात आहे. त्याशिवाय न धुतलेले अस्वच्छ मास्कचा वापर केला जात आहे. तसेच स्टेरॉइडचा चुकीचा वापरसुद्धा ब्लॅक फंगसच्या फैलावामागचे मोठे कारण असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजन