शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धोनी निवृत्तीनंतर भाजपामध्ये प्रवेश करू शकतो; वरिष्ठ नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 07:48 IST

झारखंडमधील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाची 'फिल्डींग'

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर राजकीय खेळपट्टीवर दिसण्याची शक्यता आहे. निवृत्तीनंतर धोनी भाजपामध्ये प्रवेश करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं यावर भाष्य केलं आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. यानंतर धोनीवर बरीच टीका असून त्याच्या राजीनाम्याची चर्चादेखील जोरात सुरू आहे. धोनी निवृत्तीनंतर भाजपामध्ये प्रवेश करू शकतो, अशी शक्यता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते संजय पासवान यांनी बोलून दाखवली. 'याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र धोनीनं निवृत्ती स्वीकारल्यानंतरच याविषयी निर्णय होईल,' असं पासवान म्हणाले. मी धोनीला जवळून ओळखतो. तो जगप्रसिद्ध खेळाडू असून त्याला पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पासवान यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाकडून 'संपर्क फॉर समर्थन' अभियान सुरू होतं. त्यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहांनी धोनीची भेट घेतली होती. या वर्षाच्या अखेरीस झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी धोनीनं निवृत्ती स्वीकारल्यास त्याला भाजपामध्ये आणण्यासाठी 'फिल्डींग' लावण्यात आली आहे. धोनीला थेट मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याचा विचार भाजपाकडून सुरू आहे.  

टॅग्स :MS Dhoniमहेंद्रसिंग धोनीICC World Cup 2019वर्ल्ड कप 2019BJPभाजपाAmit Shahअमित शहा