अनधिकृत बांधकाम करणा-यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल - पालिकेची शक्कल

By Admin | Updated: May 15, 2014 23:16 IST2014-05-15T21:38:06+5:302014-05-15T23:16:18+5:30

बांधकामांना साहित्य पुरवठा करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिल्या होत्या. त्याच धर्तीवर आता जागा मालक, विकासक यांच्यावर सुध्दा एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

MRTP criminal complaint filed against unauthorized construction workers - | अनधिकृत बांधकाम करणा-यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल - पालिकेची शक्कल

अनधिकृत बांधकाम करणा-यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल - पालिकेची शक्कल

ठाणे -
मुंब्रा शिळ भागात घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर आता ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी नवी शक्कल लढविली आहे. यापूर्वी बांधकामांना साहित्य पुरवठा करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिल्या होत्या. त्याच धर्तीवर आता जागा मालक, विकासक यांच्यावर सुध्दा एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
मान्सूनपूर्व तयारी निमित्त घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. यावेळी पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, एअरफोर्स प्रशासन, महावितरण आदींचे पदाधिकारी उपस्थित होते. मागील वर्षी मुंब्रा शिळ इमारत दुर्घटनेत ७४ जणांचा बळी गेला होता.त्यानंतर ठाणे महापालिकेने ही बांधकामे रोखण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती. परंतु, लोकसभा निवडणुका लागल्या आणि पुन्हा काही भागात बांधकामे उभी राहण्यास सुरूवात झाली. त्यानुसार या बांधकामांचा अतिक्रमण विभागा मार्फत सर्व्हे सुरू झाला आहे. परंतु,ती रोखण्यासाठी जागा मालकावर गुन्हा दाखल केल्यास नवीन बांधकामांना लगाम बसेल,असा दावाही त्यांनी केला आहे. मुंब्य्रात असा प्रयोग केला गेला होता. त्यावेळेस जागा मालकाने यातून अंग काढले होते. त्यानुसार विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु,यामुळे जागा मालकाने ही भूमिका घेतली तर, विकासक सुध्दा बांधकाम उभारण्यास पुढे धजावणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान अतिधोकादायक इमारतधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून त्या खाली करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार असून, विविध प्रशासकीय मंडळी व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून एका ग्रुपद्वारे कनेक्ट केली जाणार आहेत.

Web Title: MRTP criminal complaint filed against unauthorized construction workers -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.