श्री श्रींचा शांतता संदेश ‘इसिस’ने धुडकावला

By Admin | Updated: April 23, 2016 03:00 IST2016-04-23T03:00:29+5:302016-04-23T03:00:29+5:30

धार्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी पाठविलेला शांतता संदेश इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरियाने (इसिस) शिर वेगळे केलेल्या व्यक्तीचा फोटो पाठवत धुडकावला आहे

Mr. Shree's silence message was rejected by 'Isis' | श्री श्रींचा शांतता संदेश ‘इसिस’ने धुडकावला

श्री श्रींचा शांतता संदेश ‘इसिस’ने धुडकावला

अगरतळा : धार्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी पाठविलेला शांतता संदेश इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरियाने (इसिस) शिर वेगळे केलेल्या व्यक्तीचा फोटो पाठवत धुडकावला आहे. स्वत: श्रीश्रींनी येथे त्याबाबत माहिती दिली.
इसिससोबत अलीकडेच मी शांतता चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. जगभरात दहशत पसरविणाऱ्या या संघटनेने एका व्यक्तीचे शिर धडावेगळा केलेला फोटो पाठविल्यामुळे माझे प्रयत्न संपुष्टात आले आहेत, असे ते म्हणाले. इसिसने सिरिया आणि इराकमध्ये मृत्यूचे अक्षरश: थैमान घातले आहे.
इसिसच्या कृत्यावरून त्यांना कोणतीही शांतता चर्चा नको आहे, असे मला वाटते. इसिसवर लष्करानेच कारवाई करायला हवी, असे ते म्हणाले. गुरुवारी त्रिपुराची तीन दिवसांची बैठक आटोपून कोलकात्याला जाताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (वृत्तसंस्था)
>रविशंकर यांनी ईशान्येकडील राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची गरज प्रतिपादित त्रिपुरामध्ये बैठकींच्या मालिका पार पाडल्या.
सरकारसोबत चर्चा करण्याचे आवाहनही त्यांनी दहशतवादी संघटनांना केले आहे.

Web Title: Mr. Shree's silence message was rejected by 'Isis'