श्री.श्री.रविशंकरना इसिसने पाठवला मुंडकं छाटलेल्या माणसाचा फोटो

By Admin | Updated: April 22, 2016 12:58 IST2016-04-22T11:56:32+5:302016-04-22T12:58:52+5:30

जगाला शांती, अध्यात्माचा संदेश देणारे अध्यात्मिक गुरु श्री.श्री.रविशंकर यांनी इसिस बरोबर शांतता चर्चेचा प्रयत्न करुन पाहिला.

Mr. Shree Ravi Shankaran's photo of the man who sent his head | श्री.श्री.रविशंकरना इसिसने पाठवला मुंडकं छाटलेल्या माणसाचा फोटो

श्री.श्री.रविशंकरना इसिसने पाठवला मुंडकं छाटलेल्या माणसाचा फोटो

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - जगाला शांती, अध्यात्माचा संदेश देणारे अध्यात्मिक गुरु श्री.श्री.रविशंकर यांनी इसिस बरोबर शांतता चर्चेचा प्रयत्न करुन पाहिला, पण इसिसने मुंडके छाटलेल्या माणसाचा फोटो पाठवून  त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. 
 
मी इसिस बरोबर शांतता चर्चेचा प्रयत्न करुन पाहिला पण त्यांनी मला मुंडके छाटलेल्या माणसाचा फोटो पाठवला असे श्री श्री रविशकंर यांनी सांगितले. इसिसला शांतता नको आहे. त्यांच्यावर लष्करी कारवाई झाली पाहिजे असे रविशंकर आगरतळा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 
 
त्रिपुराचा तीन दिवसाचा दौरा आटोपून ते कोलकाताला रवाना झाले. सर्व संस्कृती, धर्म आणि विचारधारेला एकत्र जोडण्याचे आपले लक्ष्य असल्याचे रविशंकर यांनी सांगितले. 

Web Title: Mr. Shree Ravi Shankaran's photo of the man who sent his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.