शनिवारी मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्ट फॅशन शो लोकमत युवा नेक्स्ट, बिग बझार यांचा संयुक्त उपक्रम
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:06+5:302015-04-04T01:55:06+5:30
सोलापूर : युवा वर्गाचे हक्काचे व्यासपीठ ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि बिग बझार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता ‘मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्ट फॅशन शो 2015’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आह़े सात रस्ता येथील बिग बझार मॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होत आह़े

शनिवारी मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्ट फॅशन शो लोकमत युवा नेक्स्ट, बिग बझार यांचा संयुक्त उपक्रम
स लापूर : युवा वर्गाचे हक्काचे व्यासपीठ ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि बिग बझार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता ‘मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्ट फॅशन शो 2015’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आह़े सात रस्ता येथील बिग बझार मॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होत आह़ेया कार्यक्रमाच्या माध्यमातून फॅशन शो क्षेत्रात भवितव्य घडवू इच्छिणार्या सोलापुरातील युवा वर्गासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होणार आह़े या स्पर्धेंतर्गत सोलापुरातील विविध महाविद्यालयीन युवा-युवती सहभागी होणार आहेत़ सहभागी होणार्या युवा-युवती स्पर्धकांना विविध फेर्यातून मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्टचा किताब पटकावयाचा आह़े यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक वेशभूषा फेरी, रॅम्प वॉक, पार्टीवेअर, टॅलेंट राऊंड, परीक्षक फे री या चार फेर्यांमधून मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्ट 2015 ची निवड करण्यात येणार आह़े या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजकत्व ‘एफ़ बी़ बी़ बिग बझार’ यांनी स्वीकारले आह़े सहप्रायोजकत्व के ़ राज डिजिटल कलर लॅब यांनी स्वीकारले आह़े तसेच कम्युनिकेशन पार्टनर ‘आस्क मी’ तर रेडिओ पार्टनर बिग 92़7 एफएम आहेत़ या स्पर्धेसाठी स्पर्धकांच्या कोरीओग्राफीसाठी फॅशन डिझायनर सोनल झवेरी यांचा सहयोग लाभला आह़े कार्यक्रमाच्या निवड चाचणीसाठी अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होत़े यातून 25 विद्यार्थी, विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आह़े या कार्यक्र माला उपस्थित राहणार्यांसाठी विविध ‘गेम शो’चे आयोजन करण्यात आले आह़े त्याचबरोबर ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत़ (प्रतिनिधी)