शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जगातील ११६ देशांमध्ये Mpox विषाणूचा कहर; जाणून घ्या, भारतातील स्थिती अन् लक्षणं काय आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 09:40 IST

Mpox : भारतात सध्या या रोगाचा प्रादुर्भाव काय आहे? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे.

Mpox : नवी दिल्ली : कोरोना साथीतून जग आता पूर्णपणे सावरलं आहे. मात्र आता एक नवं संकट समोर आलं आहे. सध्या जगावर एमपॉक्स (Mpox) नावाच्या विषाणूचं संकट घोंघावत आहे. जगातील ११६ देशांमध्ये एमपॉक्स विषाणूचा प्रसार झाला आहे. एमपॉक्स विषाणूला आधी मंकीपॉक्स या नावानं ओळखलं जात होतं. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) एमपॉक्स विषाणूचा कहर पाहता आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. याचा त्रास झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर पुरळ उठतात. हा विषाणू १९५८ मध्ये माकडांमध्ये सापडला होता. यानंतर तो मानवांमध्ये पसरू लागला आहे. 

भारतात सध्या या रोगाचा प्रादुर्भाव काय आहे? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे. मात्र, सध्या भारतात या विषाणूचा प्रभाव दिसून येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या ताज्या अपडेटमध्ये म्हटलं आहे की, भारतात जानेवारी २०२२ ते जून २०२४ दरम्यान एमपॉक्सची २७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, भारतात या प्रकारच्या विषाणूपासून कोणताही धोका होण्याची शक्यता नाही. त्यावर उपचार करू शकणाऱ्या काही लसी उपलब्ध आहेत. याशिवाय, आंतरराष्ट्रीय विमानतळांवर काटेकोर निरीक्षण करून आणि संक्रमित लोकांची वेळेवर ओळख करून व्हायरस नियंत्रित केला जाऊ शकतो.

WHO नं काय सांगितलं?जागतिक आरोग्य संघटनेनं एमपॉक्स विषाणूचा कहर पाहता आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. अनेक देशांमध्ये मंकी पॉक्सच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एमपॉक्स देखील संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडू नये यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आतापर्यंत अनेक लोकांमध्ये याचा संसर्ग दिसून आला आहे. 

काँगोमध्ये ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू काँगोमध्ये आतापर्यंत १४ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. १५ वर्षांखालील मुलीही या विषाणूचा बळी ठरत आहेत, ही चिंतेची बाब आहे. समलिंगी पुरुषांमध्ये या संसर्गाचं प्रमाण अधिक आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातले आरोग्य कर्मचारी, कुटुंबीयांना देखील याचा धोका आहे. संसर्ग झाल्यानंतरही अंगावरील पुरळ पूर्ण बरे होईपर्यंत इतरांपासून दूर रहावं,  जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर!एमपॉक्स विषाणूचा धोका लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेनं तीन वर्षांत दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर केली आहे. यापूर्वी २०२२ मध्येही या विषाणूचा वेगाने प्रसार दिसून आला होता. एमपॉक्स विषाणूनं १०० हून अधिक देशांमध्ये कहर केला होता. त्यावेळी २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

एमपॉक्सची लक्षणंएमपॉक्स विषाणूमुळं व्यक्तीला त्वचेवर लाल पुरळ येतात, जे २-४ आठवडे राहू शकतात. या रुग्णाला ताप, घसा खवखवणं, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, अत्यंत थकवा येणं आणि सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजेच शरीरावर गुठळ्या होऊ शकतात. एमपॉक्स असलेले बहुतेक लोक पूर्णपणे बरे होतात, परंतु काही गंभीर आजारी होऊ शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्या