कुख्यात पंडित तिवारीविरुद्ध एमपीडीए

By Admin | Updated: September 3, 2015 23:52 IST2015-09-03T23:52:50+5:302015-09-03T23:52:50+5:30

नागपूर : अजनीतील कुख्यात गुंड पंडित ऊर्फ रोहित संतोष तिवारी (वय २१) याच्याविरुद्ध पोलिसांनी एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला कारागृहात डांबले.

MPADA against notorious Pandit Tiwari | कुख्यात पंडित तिवारीविरुद्ध एमपीडीए

कुख्यात पंडित तिवारीविरुद्ध एमपीडीए

गपूर : अजनीतील कुख्यात गुंड पंडित ऊर्फ रोहित संतोष तिवारी (वय २१) याच्याविरुद्ध पोलिसांनी एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला कारागृहात डांबले.
अजनीच्या काशीनगरात राहाणारा कुख्यात पंडित याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ले, सशस्त्र हाणामाऱ्या, जमिनी बळकावणे, खंडणी वसुली, धमक्या देणे, हिसकावून घेणे अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो कुणालाही दुखापत करीत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला हद्दपारही केले होते. मात्र, त्याच्यावर या कारवाईचा कसलाही परिणाम झाला नाही. तो गंभीर गुन्हे करीतच होता. त्याच्यामुळे सामान्य नागरिकांच्या जानमालाला धोका असल्याचे पाहून पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी बुधवारी एमपीडीच्या कारवाईचा आदेश काढला होता. त्यानुसार, गुरुवारी दुपारी अजनी पोलिसांनी कुख्यात पंडितला ताब्यात घेत त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करून त्याला कारागृहात डांबले.
---

Web Title: MPADA against notorious Pandit Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.