शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या राम मंदिरावरील विधानाबद्दल खासदार उदयनराजे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 16:05 IST

खासदार उदयनराजे भोसलेंनी खासदारकीची शपथ घेण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

ठळक मुद्दे खासदार उदयनराजे भोसलेंनी खासदारकीची शपथ घेण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

नवी दिल्ली -  राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज शपथ घेतली. कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्रम राज्यसभेत न होता, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात सकाळी ११ वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. देशातील 20 राज्यांमधून निवडून आलेल्या 62 खासदारांनी आज शपथ घेतली. त्यामध्ये, महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरपीआयचे रामदास आठवले, भाजपा नेते उदयनराजे भोसले, काँग्रेस नेते राजीव सातव आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही खासदारकीची शपथ घेतली. 

खासदार उदयनराजे भोसलेंनी खासदारकीची शपथ घेण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरुन न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी पवारांना लक्ष्य केले. 'भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात सर्व जातींमध्ये सलोखा राहिला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या विचाराचे स्वतंत्र आहे', असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत विधानावर साधारण प्रतिक्रिया दिली.

'कोरोनाचा कठीण काळ आहे.पण घरी थांबून चालणार नाही. आतापर्यंत लोकांना केंद्रबिंदू म्हणूनच आजवर काम करत आलो. जेव्हा पद नव्हतं तेव्हा समाजकारण केलं, राजकारण कधीच केले नाही. गेल्या तीस वर्षात जेवढी समाजाची सेवा करता येईल तेवढी केली. राज्यसभेच्या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करेन. केवळ सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत राहीन' असेही उदयनराजेंनी म्हटले. तसेच, 'कोरोनावर लवकरात लवकर लस निघाली पाहिजे. लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार हिरावले आहेत. किती दिवस सांगणार लोकांना घरात बसून राहा, उद्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल' अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बाबीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही असे विधान शरद पवार यांनी केले होते. पवार यांच्या या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर, विरोधकांनी शरद पवार यांच्या या विधानावरुन त्यांना टार्गेट केलंय.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMember of parliamentखासदार