शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

...अन् खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:05 IST

श्रीकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. मात्र निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, यांना वाटायला लागले, आपणच मुख्यमंत्री व्हावे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्वाच्या विचारांना कोण विचारतं. यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे आणि बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाण्याचे काम केले.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. या प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत सहभाग घेत, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर तर हल्ला चढवलाच. पण महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केले. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. तसेच हिंदूत्वावर बोलताना लोकसभेतच हनुमान चालिसाही म्हणून दाखवली.  

यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे काम केले -श्रीकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. मात्र निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, यांना वाटायला लागले, आपणच मुख्यमंत्री व्हावे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्वाच्या विचारांना कोण विचारतं. यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे आणि बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाण्याचे काम केले. बाळासाहेब म्हणत होते, मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेन. एवढेच नाही, तर निवडणुकीत आपण एकमेकांना शिव्या देता आणि निवडणुकीनंतर आघाड्या करता, जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार? असेही बाळासाहेब म्हणत होते. यांनीही असेच केले निवडणूक एकासोबत लढली आणि निवडून आल्यानंतर खुर्चीसाठी सर्व विचार बाजूला करून अनैतिक सरकार स्थापन केले."

"येथे कधी कुणीविचार केला नव्हता, की काँग्रेस सोबत शिवसेनेची आघाडी होईल. लोकांनीही कधी हा विचार केला नव्हता. मात्र लोकांसोबत मतदारांसोबत ज्यांनी ते सरकार बनवले त्यांनी गद्दारी केली. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले. ज्यांनी कारसेवकांवर गोळ्या चालवल्या त्या समाजवादी सोबतही यांनी आघाडी केली," अशी टीकाही शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठकरेंवर केली.

हणूमान चालिसा म्हणण्यावरही महाराष्ट्रात बंदी होती -श्रीकांत शिंदे म्हणाले, "हणूमान चालिसा म्हणण्यावरही महाराष्ट्रात बंदी होती. मला संपूर्ण हणूमान चालिसा येते, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी थेट लोकसभेतच हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. तसेच, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर आणि हिंदूत्वार चालणारे लोक आहोत. ज्यांना हनुमान चालिसा म्हणायची होती त्यांना कारागृहात टाकण्यात आले आणि त्यांच्यावर देश द्रोहाचा आरोप लावण्यात आला होता, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले."

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनShrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना