शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:41 IST

मध्य प्रदेशातील शेवपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

देशभरातील शाळांमध्ये लहान मुलं उपाशी राहू नये यासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली होती. याच दरम्यान मध्य प्रदेशातील शेवपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एका सरकारी शाळेत मुलांना प्लेट किंवा पानांवर नव्हे तर फाटलेल्या कागदावर जेवण देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. लहान मुलं जमिनीवर बसून भात आणि भाजी खात आहेत, तर शिक्षक जवळ उभं राहून हे सर्व पाहत होते.

शेवपूर जिल्ह्यातील विजयपूर परिसरातील हुलपूर येथील सरकारी माध्यमिक शाळेत ही संतापजनक घटना घडली. शाळेतील लहान मुलांना नेहमीप्रमाणे मध्यान्ह भोजन दिलं जात होतं. परंतु ज्या पद्धतीने ते दिलं गेलं ते सर्वांसाठीच धक्कादायक आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं की मुलांच्या समोर प्लेट नव्हत्या. पुस्तकांच्या पानांवर, फाटलेल्या कागदाच्या तुकड्यांवर त्यांना भात आणि भाजी दिली जात होती.

शाळेच्या परिसरात मुलं जमिनीवर बसलेली पाहायला मिळत आहेत. ते त्यांना दिलेलं अन्न खात होती. शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचारी यावेळी लोक उपस्थित होते, परंतु कोणीही हे थांबवण्याचा किंवा ही परिस्थिती सुधारण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. जणू काही ही रोजचीच घटना आहे असं वाटत होतं.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या मध्यान्ह भोजन योजनेत सातत्याने निष्काळजीपणा केला जात आहे. कधीकधी मुलांना कमी शिजवलेलं अन्न दिलं जातं, तर कधीकधी त्यांना खाण्यासाठी प्लेट मिळत नाहीत. यावेळी कागदावर अन्न दिलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि शाळा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Outrage: Children Served Midday Meal on Paper Pieces in School

Web Summary : Sheopur school provides midday meals to children on paper instead of plates. Students are forced to eat food served on torn pieces of paper while teachers watch. Negligence in the midday meal scheme has sparked outrage, prompting an investigation.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSchoolशाळाStudentविद्यार्थीfoodअन्न