शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
3
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
5
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
6
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
7
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
8
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
9
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
10
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
11
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
12
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
13
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
14
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
15
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
16
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
17
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
18
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
19
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
20
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

"उज्जैनमधील बलात्कार प्रकरण म्हणजे लज्जास्पद आणि माणुसकी...", प्रियंका चतुर्वेदी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 15:34 IST

अंगावर काटा आणणारी दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.

नराधमांनी चिमुरडीवर अत्याचार केला, तिचा छळ करून अर्धनग्न अवस्थेत सोडून दिले. अंगावर काटा आणणारी दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. ही हृदयद्रावक अन् संतापजनक घटना मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडली.  या घटनेने अवघ्या देशाच्या डोळ्यात पाणी आणलं. १५ वर्षीय चिमुकलीवर नराधमांनी अत्याचार केल्यानं संपूर्ण देश हादरला. एवढंच नाही तर आरोपींची क्रूरता एवढी की पीडित तरूणी ८ किलोमीटर नग्न अवस्थेत कपड्यांच्या शोधात फिरत राहिली. पण, दुर्दैव असं की कोणीच तिला आसरा दिला नाही. अखेर तिनं राहुल शर्मा नावाच्या पुजाऱ्याकडं मदत मागितली अन् तो पुजारी तिच्यासाठी देवदूत बनला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार असून विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

उज्जैन येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार म्हणजे माणुसकी कशी संपत आहे, हे दिसत असल्याचे चतुर्वेदींनी सांगितले. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना प्रियंका चतुर्वेदीं म्हणाल्या, "हा केवळ बलात्काराचा मुद्दा नसून माणुसकी कशी संपत आहे, हाही मुद्दा उपस्थित झाला आहे. यावरून आपण किती असंवेदनशील झालो आहोत हे दिसून येते. ज्या चिमुरडीसोबत एवढी लज्जास्पद घटना घडली त्या लहान मुलीच्या मदतीसाठी आम्ही पुढे येत नाही हे अमानवीय आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात गेले पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे." 

दरम्यान, या प्रकरणी उज्जैन पोलिसांनी  रिक्षा चालकासह पाच आरोपींना अटक केली आहे. उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. नग्न अवस्थेत फिरलेल्या पीडितेला आता अनेकजण मदत करत आहेत. अशातच महाकाल पोलीस ठाण्यातील अधिकारी अजय वर्मा यांनी माणुसकीचे दर्शन दाखवले. खरं तर त्यांनी पीडित मुलीला दत्तक घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच तिच्या शिक्षणाचा आणि संगोपनाचा संपूर्ण खर्च ते करणार आहेत.

देवदूत पुजाऱ्याने सांगितली आपबीती पीडित तरूणी नग्न अवस्थेत फिरत असताना मदतीला आलेल्या देवदूत पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिला बोलता देखील येत नव्हतं. त्याने तिला नाव विचारले, कुटुंबीयांबद्दल विचारले, तिला इथे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. तो तिची माहिती विचारत होता परंतु ती खूप घाबरली होती. दरम्यान, कोणीही आले तरी ती खूप घाबरायची. पोलिसांना पाहून पीडितेच्या तोंडून शब्द देखील फुटत नव्हता.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारी