BJP MLA : मध्यप्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाने सागर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदाराच्या घरावर छापा टाकला. पथकाने 19 किलो सोने आणि 3.80 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. पण यादरम्यान आयकर विभागाच्या पथकाने एक असे दृष्य पाहिले, ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. या माजी आमदारांने आपल्या घरात चक्क मगरी पाळल्या होत्या. भारतात मगरी पाळणे कायद्याने गुन्हा आहे. ही बाब समोर आल्यानंतर आयकर विभागाने वनविभागाला याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे बांदा येथील माजी आमदार हरवंशसिंग राठोड आणि बिडी-बांधकाम व्यावसायिक राजेश केशरवानी यांच्या घरावर आयकर विभागाच्या पथकाने छापे टाकले. माजी आमदाराच्या प्रकरणात कारवाई पूर्ण झाली आहे, तर व्यावसायिकाच्या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे. यादरम्यान टीमला अनेक आश्चर्यकारक गोष्टी सापडल्या आहेत.
14 किलो सोने आणि 3.80 कोटी रोकडआयकर विभागाच्या पथकाने या दोघांच्या ठिकाणांहून कोट्यवधी रुपयांची करचोरी पकडली आहे. याशिवाय 200 कोटी रुपयांहून अधिक संपत्तीही तपासात उघड झाली आहे. तपासादरम्यान पथकाला 14 किलो सोने आणि 3 कोटी 80 लाख रुपये सापडले. तसेच, 150 कोटी रुपयांची करचोरी केल्याचे टीमला आढळून आले. भाजपचे माजी आमदार हरवंशसिंह राठोड यांच्या घरी आयकर विभागाने केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा साठा सापडला आहे. तर, बीडी व्यावसायिक राजेश केशरवानीच्या घरातून सात गाड्याही जप्त केल्या आहेत.
घरात सापडल्या तीन मगरी माजी आमदाराच्या घरात आयकर विभागाच्या पथकाला एक छोटा तलाव आढळला, ज्यात तीन मगरी आढळून आल्या. आमदाराने चक्क आपल्या घरात मगरी पाळल्या होत्या. मगरी पाळणे कायद्याने गुन्हा आहे. यानंतर आयकर पथकाने वनविभागाला माहिती दिली.
कोण आहेत हरवंशसिंग राठौर?सागर जिल्ह्यातील मोठे व्यापारी असलेले हरवंशसिंग राठौर भाजपचे दिग्गज नेते आहेत. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत ते बांदा येथून भाजपच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले होते. हरवंश यांचे वडील हरनाम सिंह राठौर हेदेखील मध्यप्रदेशात उमा भारती सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.