शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

“लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, रश्मी ठाकरेंना कैदेत टाकल्यावर…”; नवनीत राणांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 13:17 IST

काश्मिरमध्ये हनुमान चालिसा म्हणू शकते तर महाराष्ट्रात का नाही, शिवसेना औरंगजेबाची सेना झाली आहे का, असा सवाल नवनीत राणा यांनी केला.

नवी दिल्ली: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत मुंबईतील बीकेसी मैदानावर भव्य सभा घेतली. यावेळी अनेकविध मुद्द्यांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावर भाजप नेत्यांनीही पलटवार करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. मात्र, यातच आता खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती. जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले, तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली. 

नवनीत राणा दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर राणा दाम्पत्यासह किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे. मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला आलेले पळून गेले अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावर टीका केली. याला आता नवनीत राणा यांनी दिले आहे.

तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे. ती वेळही लवकरच येणार आहे, जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगात जाईल, या शब्दांत नवनीत राणा यांनी आपली सल बोलून दाखवली. तसेच मुख्यमंत्र्यांनी गदा हातात न घेता त्याला करंट लागत असल्यासारखे वर्तन केले. उद्धव ठाकरेंनी गदेचा अपमान केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती. अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एकतरी व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंतर तिप्पट प्रमाणात राज्यात बेरोजगारी वाढली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलले नाहीत. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचं तुम्हीच म्हणाला होता. पण सभेत बोलताना त्याची काही गरज नाही म्हणता. एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत, अशी टीका राणा यांनी केली. 

काश्मिरमध्ये हनुमान चालिसा पठण करू शकते तर महाराष्ट्रात का नाही? 

मला म्हणाले हनुमान चालिसा काश्मीरमध्ये जाऊन म्हणा. जर मी काश्मिरमध्ये हनुमान चालिसा पठण करू शकते तर महाराष्ट्रात का नाही? मी नवनीत राणा, रवी राणाच्या फायद्यासाठी हनुमान चालिसा म्हणणार नव्हते. तुम्ही पुरुष आहात, माझ्यापेक्षा महिलेपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत. पण तुम्ही तुमच्या शक्तीचा गैरवापर केलात. हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी करणाऱ्या महिलेला तुम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकता. पण औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. शिवसेना औरंगजेबाची सेना झाली आहे का?, असा रोखठोक सवाल नवनीत राणा यांनी केला. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण