शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नाराज नारायण राणेंना भाजपाकडून जाहीरनामा समितीत स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 20:03 IST

नारायण राणेंची नाराजी दूर करण्याचा भाजपाचा प्रयत्न

मुंबई: आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नारायण राणेंना भाजपानं जाहीरनामा समितीत स्थान दिलं आहे. लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा ठरवण्यासाठी भाजपानं वीस सदस्यांची समिती तयार केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आज भाजपानं विविध समित्यांची घोषणा केली. यामधील जाहीरनामा समितीत नारायण राणेंचा समावेश असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा करणाऱ्या राणेंना भाजपाचा निवडणूक जाहीरनामा ठरवणाऱ्या समितीत स्थान कसं काय देण्यात आलं, असा प्रश्न राजकीय वर्तुळातील अनेकांना पडला. या समिती सदस्यांच्या यादीत राणे यांचं नाव 16 व्या क्रमांकावर आहे. भाजपापुरस्कृत खासदार असलेले नारायण राणेंनी गेल्या काही दिवसांपासून सतत भाजपावर टीका केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पुढील निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र आता त्यांना भाजपानं जाहीरनामा समितीत स्थान दिलं आहे. राणेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपानं त्यांची वर्णी या समितीत लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नारायण राणेंचा समावेश असलेल्या जाहीरनामा समितीत भाजपाच्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अरुण जेटली, निर्मला सीतारामन, थावरचंद गेहलोत, रवीशंकर प्रसाद, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, के. जी. अल्फॉन्स, किरज रिजीजू यांच्यासह शिवराज सिंह चौहान, सुशील मोदी, केशव प्रसाद मौर्य, अर्जुन मुंढा, राम माधव, भूपेंद्र यादव, मीनाक्षी लेखी, संजय पासवान, हरी बाबू, राजेंद्र मोहन सिंह चीमा यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९