शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

'वय झालं की मरावच लागतं'! कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंवर MPच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 19:52 IST

जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर बुधवारी तब्बल 41 मृतांवर अंतिमसंस्कार करण्यात आला. मात्र, शहरात केवळ पाचच मृत्यू झाल्याचा दावा राज्य सरकारच्या आरोग्य बुलेटिनने केला आहे.

ठळक मुद्देकोरोनाने मध्य प्रदेशातही थैमान घातले आहे. येथील कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे.कोरोना मृत्यूंवर शिवराज सरकारमधील मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर बुधवारी तब्बल 41 मृतांवर अंतिमसंस्कार करण्यात आला.

भोपाळ - कोरोनाने मध्य प्रदेशातही थैमान घातले आहे. येथील कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. एकीकडे रोजच्या रोज हजारो करोनाबाधित समोर येत असतानाच दुसरीकडे शेकडोच्या संख्येने मृत्यूही होत आहेत. मात्र, या मृत्यूंवर शिवराज सरकारमधील मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लोकांचे वय झाले, की मरावेच लागते, असे पशुपालन मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी म्हटले आहे.  (MP Minister Prem Singh Patel controversial comment on corona deaths)

CoronaVirus : बेजबाबदारपणाचा कळस! आधी दिली Covaxin, तर दुसऱ्यांदा दिला Covishieldचा डोस; मग...

प्रेम सिंह यांना मध्य प्रदेशात कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंच्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, की मृत्यू झाले आहेत, ते कुणीही थांबू शकत नाही. डॉक्‍टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांनी डॉक्टरांकडे जायला हवे. मृत्यूंच्याच बाबतीत सांगायचे, तर लोकांना आपले वय पूर्ण झाले, की मरावेच लागते.

जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर 41 मृतांवर अंत्यसंस्कार -मध्येप्रदेशातील रुग्णालयांतून भयावह दृष्य समोर येत असतानाच प्रेम सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. एवढेच नाही, तर शिवराज सरकार कोरोनामुळे होत असलेल्या मृतांचे आकडे लपवत असल्याचा आरोपह विरोधक करत आहेत. जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर बुधवारी तब्बल 41 मृतांवर अंतिमसंस्कार करण्यात आला. मात्र, शहरात केवळ पाचच मृत्यू झाल्याचा दावा राज्य सरकारच्या आरोग्य बुलेटिनने केला आहे.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

भोपाळ आणि इंदूर येथील स्मशानभूमीतही, अशीच स्थिती बघायला मिळाली. येथे लोकांना आपल्या नातलगाच्या अंत्यसंस्कारासाठी अक्षरशः वाट बघावी लागली.

24 तासांत 9 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण - मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत 9 हजार हून अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर कोरोनामुळे 51 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. राज्यात आतापर्यंत 3 लाख 63 हजारहून अधिक लोकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश पाठोपाठ आता गुजरातमध्ये कोरोनाचा कहर -महाराष्ट्र, दिल्ली पाठोपाठ आता गुजरातमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक स्मशानांबाहेर मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अहमदाबाद, सूरत सारख्या प्रमुख शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू धर्मात साधारणपणे सूर्योदयानंतर अंत्यविधी करत नाहीत. मात्र कोरोना मृतांचा आकडा वाढतच असल्यानं अनेक ठिकाणी रात्रीदेखील अंत्यस्कार सुरू आहेत. 

एकाचवेळी 25 जणांना अग्नी -सूरत शहरातल्या उमरा भागात एका स्मशानात दोन दिवसांपूर्वी एकाचवेळी 25 जणांना अग्नी देण्यात आला. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बडोद्यातही रात्रीच्या वेळी मृतदेहांवर अंत्यविधी होत आहेत. गुजरातच्या प्रमुख शहरांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि मृतांच्या नातेवाईकांना फार वेळ प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी अधिकाऱ्यांनी लोखंडाच्या चिता तयार केल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू