शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"तुम्ही सेलिब्रिटी असल्याची पर्वा नाही"; अध्यक्षांवर संतापल्या जया बच्चन, म्हणाल्या, "आम्ही इथे काय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 14:05 IST

राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी खरपट्टी काढल्यानंतर खासदार जया बच्चन यांनी रोष व्यक्त केला.

Jaya Bachchan-Jagdeep Dhankar: खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात राज्यसभेत जोरदार वादावादी झाली. राज्यसभेच्या कामकाजादरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखर यांच्या बोलण्याच्या स्तरावरुन प्रश्न उपस्थित केला. अध्यक्ष धनखड यांनी जया अमिताभ बच्चन असा उल्लेख केल्यानंतर जया बच्चन संतापल्या. मला तुमच्या बोलण्याचा टोन हा योग्य वाटला नाही असं म्हणत जया बच्चन यांनी आक्षेप घेतला. यावर संतप्त झालेल्या धनखड यांनी  जया बच्चन यांची खरडपट्टी काढली. दररोज मला हे पुन्हा असा प्रकार नकोय, असे धनखड यांनी सुनावलं. त्यानंतर जया बच्चन यांनी सभागृहाच्या बाहेर पडत याप्रकरणावर भाष्य केलं.

पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा संसदेचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र जया बच्चन यांच्याबाबत राज्यसभेत पुन्हा एकदा गदारोळ झाला. याआधी अध्यक्ष धनखड यांनी जया बच्चन यांचे नाव घेताना जया अमिताभ बच्चन असे म्हटल्याने हा वाद सुरु झाला होता. माझी स्वत:ची ओळख असताना माझ्या पतीचे नाव घेतले जाऊ नये, असे जया बच्चन यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोघांमध्ये शा‍ब्दिक चकमक पाहायला मिळाली.

जया बच्चन यांची राज्यसभेत बोलण्याची पाळी आली तेव्हा सभापतींनी त्यांचे नाव पुकारले गेले. यावर जया बच्चन यांनी अध्यक्ष धनखड यांच्यावर आरोप केला. "मी जया अमिताभ बच्चन, आज हे सांगू इच्छिते की मी एक कलाकार आहे, मला बॉडी लँग्वेज आणि एक्सप्रेशन समजते. मला माफ करा सर, पण तुमच्या बोलण्याचा टोन मला मान्य नाही. तुम्ही खुर्चीवर असलात तरी आम्हीसुद्धा सहकारी आहोत,"  असे जया बच्चन म्हणाल्या.

त्यानंतर जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिलं. "जया जी, तुम्ही खूप नाव कमावलं आहे. सारे तुमचा आदर करतात. पण तुम्हाला माहिती असेल की अभिनेत्याला कुठली गोष्ट कशी सांगायची हे दिग्दर्शकाला योग्य माहिती असते. तुम्ही काही गोष्टी तिथे बसून पाहू शकत नाही, ज्या मी या खुर्चीत बसून पाहू शकतो. दररोज मला हा असा प्रकार नकोय. मी येथून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. तुम्ही माझ्या टोन बाबत बोलताय. आता बास झालं. तुम्ही भलेही सेलिब्रिटी असाल पण तुम्हाला सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल. मी हे सारखं सारखं सहन करणार नाही," अशा शब्दात धनखड यांनी सुनावलं.

त्यानंतर जया बच्चन यांनी सभागृहाबाहेर येत याप्रकरणी भाष्य केलं. "ते काय आम्हाला जेवायला घालत नाही. मी अध्यक्षांच्या टोनवर आक्षेप घेतला. आम्ही सगळे काय शाळकरी मुलं नाहीत. आम्ही सर्व ज्येष्ठ आहोत. विशेषत: जेव्हा विरोधी पक्षनेते (मल्लिकार्जुन खर्गे) बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी माईक बंद केला. तुम्ही हे कसे करू शकता? हे परंपरेच्या विरोधात आहे. त्यांना बोलू दिले नाही तर आम्ही इथे काय करायला आलो आहोत? ते नेहमी असंसदीय शब्द वापरतात. ते म्हणाले की, तुम्ही सेलिब्रिटी आहात याची मला पर्वा नाही. हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे आता मला माफी हवी आहे," असे जया बच्चन यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाJaya Bachchanजया बच्चनSamajwadi Partyसमाजवादी पार्टी