एमपीचे गृहमंत्री सीपी कार्यालयात
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:22+5:302015-02-13T00:38:22+5:30
तासभर चर्चा : अनेक बाबी घेतल्या समजावून

एमपीचे गृहमंत्री सीपी कार्यालयात
त सभर चर्चा : अनेक बाबी घेतल्या समजावूननागपूर : मध्य प्रदेश(एमपी)चे गृहमंत्री बाबूलाल गौर आज सकाळी पोलीस आयुक्तालयात पोहचले. त्यांनी तासाभराच्या चर्चेत पोलीस आयुक्त कौशल किशोर पाठक यांच्याकडून आयुक्तालयाच्या कामकाजाची पद्धत समजावून घेतली. मध्य प्रदेशात पोलीस आयुक्तालयाची प्रथा नाही. त्यामुळे तेथील पोलीस अधिकाऱ्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. निर्णय घेताना अडचणीचे ठरते. या आणि अशाच अडचणी दूर करून पोलीस अधिकाऱ्यांना कामकाज सहजपणे करता यावे, तातडीने निर्णय घेता यावे, यासाठी मध्य प्रदेशात पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा विचार मध्य प्रदेश सरकार करीत आहे. या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री गौर आज सकाळी ११ च्या सुमारास पोलीस आयुक्तालयात पोहचले. त्यांच्यासोबत पोलीस महानिरीक्षक राव होते. पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाची पद्धत गृहमंत्री गौर आणि आयजी राव यांना समजावून सांगितली. --अभिनाश कुमार सुटीवर गंगाजमुना वस्तीतील वेश्याव्यवसाय बंद करणारे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार हे अचानक पाच दिवसांच्या सुटीवर गेल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अभिनाश कुमार हे मूळचे बिहारमधील असून, त्यांना आवश्यक काम आल्यामुळे ते मंगळवारी तातडीने सुटीवर गेल्याचे सांगितले जाते. मात्र, कुमार यांची चंद्रपूरला बदली होणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या आठवड्यात सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या अचानक सुटीवर गेल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. --