शहरं
Join us  
Trending Stories
1
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
2
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
3
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
4
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील ७ वाजता पत्रकार परिषद घेणार
5
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
6
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
7
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
8
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
9
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
10
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
11
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
12
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
13
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
14
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
15
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
16
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
17
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
18
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
19
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
20
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या

"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील"

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 3, 2021 14:26 IST

"हे आंदोलन एक प्रयोग आहे. जर यशस्वी झाले, तर पुढे लोक आणखीही आंदोलनं करतील."

भोपाळ - केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीला लागून असलेल्या विविध राज्यांच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात सरकार आणि आंदोलक शेतकरी, यांच्यात अनेक वेळा चर्चा झाल्या. मात्र, कुठल्याही प्रकारचा तोडगा अद्याप निघालेला नाही. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक, या दोघांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, हे आंदोलन एक प्रयोग आहे. जर यशस्वी झाले, तर पुढे लोक आणखीही आंदोलनं करतील.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, नरोत्तम मिश्रा म्हणाले, हे शेतकऱ्यांचे आंदोलन एक प्रयोग आहे. जर हे यशस्वी ठरले, तर लोक सीएए-एनआरसी, कलम 370 आणि राम मंदिराच्या विरोधातही आंदोलन सुरू करतील. हे कुणालाही समजावता येईना, की कृषी कायद्यांमध्ये असे काळे काय आहे, ज्यांचा ते उल्लेख करत आहेत. एवढेच नाही, तर हे आंदोलन केवळ गृहितकांवरच आधारलेले आहे, असेही ते म्हणाले.

कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनात होऊ शकतो हिंसाचार - २६ जानेवारीला ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर गुप्तचर यंत्रणांनी पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांना इशारा दिला आहे. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्राणघातक शस्त्रे लपविण्यात आली आहेत. गुप्तचर विभागाशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार सिंधु बॉर्डर आणि टीकरी बॉर्डर अतिसंवेदनशील आहे. २६ जानेवारीप्रमाणेच ६ फेब्रुवारी किंवा त्याच्या आसपास दिल्लीसह इतर शहरातही चक्का जामच्या बहाण्याने हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. लाल किल्ल्यासारख्या घटनेप्रमाणेच धारदार शस्त्रास्त्रांसह मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरविण्याचा संबंधितांचा हेतू असेल. हरियाणाला लागून असलेल्या सीमा भागात धोका अधिक असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. पंजाब, हरियाणातील गुंडांसह देशविरोधी शक्ती या आंदोलनात उतरल्या आहेत, यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा कट असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर दिल्ली पोलिस सतर्क झाले आहेत. 

रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ -दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. बुधवारी राज्यसभेत शेतकरी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले, सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या ३ खासदारांना निलंबित करण्यात आले, आपचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वेलमध्ये पोहचले, आप खासदारांची घोषणाबाजी आणि गदारोळ पाहून अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhi violenceदिल्लीMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाMLAआमदार