मुंबईः मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडल्यानं शिवप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे. छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असलेल्या उदयनराजेंनीही या प्रकारावरून कमलनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे JCBने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले ते प्रकार अतिशय संतापजनक आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी झाल्या प्रकाराबद्दल सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे. स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल हजारो शिवप्रेमींनी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर विराजमान केला, त्याबद्दल सर्व मावळ्यांचे आभार, असंही ट्विट करत उदयनराजे म्हणाले आहेत. ट्विटच्या शेवजी जय शिवराज असंही उदयनराजेंनी नमूद केलं आहे.
शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक- उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 10:05 IST
मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडल्यानं शिवप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे.
शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक- उदयनराजे
ठळक मुद्देमध्य प्रदेशातील छिंदवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडल्यानं शिवप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे. छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असलेल्या उदयनराजेंनीही या प्रकारावरून कमलनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहेमध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे JCBने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले ते प्रकार अतिशय संतापजनक आहे.