शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

खासदार दानिश यांचे पंतप्रधानांबद्दल अपशब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:11 IST

भाजपचा आरोप; आरोप निराधार : दानिश

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी २१ सप्टेंबर रोजी लोकसभेत बसपा खासदार दानिश अली यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. यावरून बराच गदारोळ सुरू आहे. विरोधक एकवटले असून बिधुरी यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. दरम्यान, दानिश अली यांनी पंतप्रधानांविरुद्ध अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

खासदार निशिकांत दुबे यांनी सभापतींना पत्र लिहून दानिश यांनी  पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरल्याची तक्रार केली आहे. दानिश म्हणाले, ‘देशाच्या पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरण्याइतपत नीतिमत्ता ढासळली नाही. हे आरोप बिनबुडाचे आहेत, मी ते गांभीर्याने घेत नाही, असे म्हणाले.

रमेश बिधुरी यांचे मौनभाजप खासदार रमेश बिधुरी यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. याबाबत रविवारी बिधुरी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याप्रकरणी लक्ष घालतील, असे भाजप खासदाराने सांगितले.

दुबे यांचे पत्रलोकसभा सभापतींना लिहिलेल्या पत्रात निशिकांत दुबे लिहितात, दानिश अली यांनी पंतप्रधान मोदींविरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरले होते. कोणत्याही देशभक्त लोकप्रतिनिधीचा संयम सुटण्यासाठी हे पुरेसे आहे, असे मला वाटते. यामुळे रमेश बिधुरी यांनी त्याला जशास तसे उत्तर दिले.

टॅग्स :BJPभाजपाMember of parliamentखासदार