शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१४ वर्षीय गरोदर नातीची आजीने घरीच केली प्रसृती; नवजात बाळाला पिशवीत गुंडाळून फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 12:41 IST

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दोन दिवसांच्या नवजात मुलीला फेकून देणाऱ्या नर्सला पोलिसांनी अटक केली आहे.

Bhopal Crime : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बुधवारी बंद  पिशवीत अवस्थेत सापडलेल्या दोन दिवसांच्या नवजात मुलीचा गुरुवारी मृत्यू झाला. याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. नवजात मुलगी ही आठवीतील विद्यार्थिनी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीची आजीने एका डॉक्टरच्या मदतीने प्रसृती केली होती. त्यानंतर नर्सने ते बाळ फेकून दिलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर जिवंत नवजात बाळाला फेकून देणाऱ्या नर्स, डॉक्टर आणि मुलीची आजी यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी तिघांचे जबाब नोंदवले असून, त्यात नर्सने धक्कादायक खुलासा केला आहे.

भोपाळच्या ऐशबागमध्ये पिशवीत सापडलेल्या दोन दिवसांच्या नवजात मुलीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. तिथल्याचे एका नर्सने या नवजात मुलीला पिशवीतून फेकून दिलं होतं. एका सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. पीडित मुलीवर शेजारच्या चुलत भावाने बलात्कार केला होता. अल्पवयीन मुलगी ही सात महिने गरोदर होती. गर्भपात करु न शकल्याने मुलीच्या आजीने गुपचूप तिची प्रसृती करण्याचा निर्णय घेतला होता. 

यासाठी मुलीच्या आजीने अशोका गार्डनमध्ये क्लिनिक चालवणारे डॉ.सुरेंद्र नहार यांच्याशी संपर्क साधला. डॉ.नहार यांनी नर्स फिरदौस खान यांच्याशी मुलीच्या कुटुंबाची ओळख करून दिली. नर्सने ६० हजार रुपये आगाऊ घेऊन अल्पवयीन प्रसूती करून घेतली आणि नवजात अर्भकाला फेकून दिले आणि घरी परतली. मात्र तिथल्या एका सीसीटीव्हीमध्ये ही सर्व घटना कैद झाली. नवजात मुलगी सापड्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता त्यांना सीसीटीव्हीमध्ये नर्स फिरदौस खान दिसली.

यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची आजी, नर्स आणि प्रसूती करणारे डॉक्टर सुरेंद्र नहार यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात मुलीला फेकण्यासाठी वापरलेली मोपेडही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी नवजात मुलीला फेकणाऱ्या आरोपीची ओळख पटवण्यासाठी रोड मॅप तयार केला आणि बाग उमराव दुल्हा ते नवीन नगरपर्यंत ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपी महिलेच्या घरापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

सर्वात आधी पोलिसांनी नर्सला अटक केली, तिने चौकशीदरम्यान सहकारी डॉ सुरेंद्र नहारचे नाव उघड केले. या दोघांच्या माहितीनुसार, पोलिसांनी अखेर अल्पवयीन मुलीच्या घरी पोहोचून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले. अल्पवयीन मुलीच्या आजीकडे चौकशी केली असता पीडितेचे १७ वर्षीय चुलत भावासोबत शारीरिक संबंध असल्याचे उघड झाले. त्यांना याबाबत माहिती मिळेपर्यंत गर्भातील बाळ मोठं झालं होतं. त्यांनी गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांची भेट घेतली. मात्र तसे झाल्यास डॉक्टरांनी मुलीच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले.

दरम्यान, बुधवारी अल्पवयीन मुलीने सातव्या महिन्यात एका नवजात बाळाला जन्म दिला. डॉक्टरे त्याची सहकारी नर्स फिरदोश खान हिच्यासोबत बाळाची घरीच प्रसूती करून दिली आणि नवजात बाळाला पिशवीत टाकून फेकण्यासाठी नर्सला दिले. त्याबदल्यात डॉक्टर आणि नर्सने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांकडून ६० हजार रुपये घेतले होते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस