शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसला अन् फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 9:59 AM

न्यायाधीशांच्या खुर्चीवरील सेल्फी महागात पडला

भोपाळ : न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून सेल्फी काढणं एका प्रशिक्षणार्थी पोलिसाला चांगलंच महागात पडलं. पोलीस दलात सामील होण्याची तयारी करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसल्यास एक वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शनिवारी न्यायाधीश के. पी. सिंह यांचं न्यायालय रिकामं होतं. तिथून जात असलेल्या प्रशिक्षणार्थी हवालदार राम अवतार रावत याच्या ही गोष्ट लक्षात आली. न्यायालय रिकामं दिसताच राम न्यायालयात गेला. यानंतर राम न्यायाधीशांच्या खुर्चीत बसला आणि सेल्फी काढू लागला. रामला न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेलं पाहून तिथल्या एका कर्मचाऱ्यानं त्याला हटकलं. त्यामुळे रामचा पार चढला. 'मी पोलीस आहे. त्यामुळे मला वाटेल ते मी करेन,' असं रामनं कर्मचाऱ्याला म्हटलं. यानंतर त्या कर्मचाऱ्यानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत राम अवतार रावत विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतलं. आपण प्रशिक्षणार्थी असून केवळ मजा म्हणून न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून सेल्फी काढला, असं रामनं पोलिसांना सांगितलं. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसल्यास एखाद्या व्यक्तीला एक वर्षाचा तुरुंगवास अथवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र रामची जामिनावर सुटका झाली.  

टॅग्स :Courtन्यायालयJara hatkeजरा हटके