शहरं
Join us  
Trending Stories
1
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
2
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
3
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
4
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
5
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
6
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
7
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
8
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
9
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
11
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
12
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
13
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
14
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
15
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
16
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
17
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
18
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
19
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
20
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली

शिवराज सिंह चौहान राहुल गांधींवर संतापले, अब्रुनुकसानीचा खटला करणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 8:56 AM

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची शक्यता आहे.

भोपाळ - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची शक्यता आहे. सोमवारी (29 ऑक्टोबर) रात्री उशिरा त्यांनी याबाबतची माहिती दिली. सध्या राहुल गांधी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. झाबुआ येथे सोमवारी (29 ऑक्टोबर) जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट केले. ते म्हणाले की, ''शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्सच्या यादीमध्ये आले होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचेही नाव पनामा पेपर्समध्ये आले. पाकिस्तानसारख्या देशानंही त्यांची कारागृहात रवानगी केली. पण येथील मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये येऊनही त्यांच्याविरोधात कोणती कारवाई केली जात नाही''.

 

याविरोधातच चौहान यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. राजकीय भाषणादरम्यान आपल्या मुलाच्या नावाचा विनाकारण उल्लेख करण्यात आल्याच्या कारणामुळे शिवराज सिंह चौहान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात रात्री उशिरा ट्विट करत त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्याविरोधात मंगळवारी (30ऑक्टोबर) अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. 

पुढे ते असंही म्हणालेत की, 'गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेस माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर आरोप करत आहे. आम्ही सर्वांचा सन्मान ठेऊन मर्यादा पाळतो. मात्र आजतर राहुल गांधींनी माझ्या मुलाचं नाव पनामा पेपर्समध्ये आल्याचे सांगून सर्व सीमाच पार केल्या आहेत. याबाबत आम्ही अब्रुनुकसानीचा दावा करणार आहोत.' शिवराज यांच्या मुलानंही केलं ट्विट शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेय चौहाननंही राहुल गांधी यांच्या विधानासंदर्भात ट्विट करत म्हटलं की, पनामा पेपर्समध्ये माझं नाव आल्याचं खोटे विधान राहुल गांधी यांनी केले. सार्वजनिक व्यासपीठावरुन माझी आणि माझ्या कुटुंबीयांची प्रतिमा खराब करण्यात आल्यानं मी दुःखी आहे. 48 तासांच्या आत त्यांनी माफी नाही मागितली तर याविरोधात कठोर कायदेशीर कारवाईसाठी पाऊलं उचलेन. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीshivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानPanamaपनामा