शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : "काँग्रेसच्या खोटारडेपणाचा फुगा फुटला, नेते इकडे-तिकडे पळताहेत"; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 12:47 IST

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेगवेगळ्या जिल्ह्यात निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत.

मध्य प्रदेशातील 240 विधानसभा जागांवर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राज्यात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. याच दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेगवेगळ्या जिल्ह्यात निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान आज सतना, छतरपूर आणि नीमचमध्ये प्रचार करणार आहेत. मोदी सतना येथे पोहोचले आहेत, जिथे ते रॅलीला संबोधित करत आहेत. आज भारताचा आवाज जगभरात ऐकू येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

पीएम मोदी म्हणाले, "यावेळची मध्य प्रदेशची निवडणूक खूपच रंजक आहे. मतदानाला इतके दिवस बाकी आहेत पण त्याआधीच काँग्रेसच्या खोटारडेपणाचा फुगा फुटला आहे. काँग्रेसचा खोटारडेपणाच्या फुग्यातील हवा निघून गेली आहे. हारणाऱ्या काँग्रेसचे नेते इकडे तिकडे पळत आहेत आणि फक्त गोंधळ घालत आहेत. त्यांच्याकडे मध्य प्रदेशच्या विकासाचा रोडमॅप नाही."

"काँग्रेसच्या राज्यात सर्वत्र भ्रष्टाचार होता. आता जलद विकासाची आणि सर्वांच्या  प्रगतीची वेळ आली आहे. भाजपा गरिबांची स्वप्ने सत्यात उतरवत आहे. काँग्रेस सरकार राज्यातील लोकांना कायमस्वरूपी घरे देण्यात अपयशी ठरलं आहे. मोदीने सर्वांना कायमस्वरूपी घरे देण्याचे आश्वासन दिले आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 

रॅलीत जमलेल्या हजारोंच्या गर्दीकडे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मध्य प्रदेशातील सतना येथे होणाऱ्या विशाल जाहीर सभेत मला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने येणारे माझे कुटुंबीय तीन डिसेंबरला होणाऱ्या निकालाची घोषणा करत आहेत." नरेंद्र मोदींनी याआधी देखील काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेस