मौदा.. लाच

By Admin | Updated: January 9, 2015 01:18 IST2015-01-09T01:18:37+5:302015-01-09T01:18:37+5:30

तलाठी व मंडळ अिधकार्‍यास लाच घेताना अटक

Moua .. bribe | मौदा.. लाच

मौदा.. लाच

ाठी व मंडळ अिधकार्‍यास लाच घेताना अटक
मौदा येथील प्रकार : लाचलुचपत प्रितबंधक िवभागाची कारवाई
मौदा : शेतात माती खोदण्याची परवानगी घेतली नसल्याचे कारण पुढे करीत शेतकर्‍याकडून १२ हजार ५०० रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी व मंडळ अिधकार्‍यास अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रितबंधक िवभागाने गुरुवारी तहसील कायार्लय पिरसरात केली. सुधाकर राठोड ( ४८, मंडळ अिधकारी, तहसील कायार्लय मौदा) व अरुण महादेव सुटे (४७, तलाठी, तहसील कायार्लय मौदा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे महसूल िवभागात एकच खळबळ उडाली.
तक्रारकत्यार् शेतकर्‍याने स्वत:च्या मालकीच्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केले. तेथील माती एका ट्रॅक्टरद्वारे घरकामासाठी नेत असताना मंडळ अिधकारी सुधाकर राठोड व तलाठी अरुण सुटे यांनी सदर शेतकर्‍यास खोदकामाच्या परवानगीबाबत िवचारणा केली. खोदकामाची परवानगी घेतली नसल्यामुळे शेतातील ट्रॅक्टर व जेसीबी तहसील कायार्लयात जमा करण्याची फमार्नही दोन्ही अिधकार्‍यांनी सोडले. तक्रारकत्यार् शेतकर्‍यांनी िवनापरवानगीने माती खोदकाम केल्यामुळे ४८ हजार रुपये दंड वसूल करण्याची धमकी त्यांनी शेतकर्‍याला िदली. यातून दोघांनाही प्रत्येकी १५ हजार रुपये द्यावे लागेल, असे सांगत प्रकरण शांत झाले. याबाबत तक्रारकत्यार्ं शेतकर्‍यांनी लाचलुचपत प्रितबंधक िवभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार गुरुवारी लाचलुचपत प्रितबंधक िवभागाने तहसील कायार्लय पिरसरात सापळा रचला. दरम्यान तलाठी अरुण सुटे व मंडळ अिधकारी सुधाकर राठोड यांना १२ हजार ५०० रुपये स्वीकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली. सदर दोन्ही आरोपीिवरुद्ध मौदा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रितबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रितबंधक िवभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या मागर्दशर्नात पोलीस िनरीक्षक िकशोर पवर्ते, जीवन भातकुले, सहायक फौजदार हेमंतकुमार उपाध्याय, अशोक लुलेकर, सिचन हलमारे, गौतम राऊत, अिश्वनकुमार गोस्वामी, पराग राऊत, मनोज पंचबुद्धे, चालक मनोज चव्हाण यांच्या पथकाने केली. (प्रितिनधी)

Web Title: Moua .. bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.