ट्रकच्या धडकेने मोटरसायकलस्वार ठार

By Admin | Updated: February 6, 2015 01:17 IST2015-02-06T01:17:33+5:302015-02-06T01:17:33+5:30

कळमना : अपघातामुळे तणाव

A motorcyclist killed in a truck shock | ट्रकच्या धडकेने मोटरसायकलस्वार ठार

ट्रकच्या धडकेने मोटरसायकलस्वार ठार

मना : अपघातामुळे तणाव
नागपूर : भरधाव ट्रकची धडक बसल्यामुळे मोटरसायकलस्वाराचा करुण अंत झाला. आज दुपारी १२ च्या सुमारास जुना पारडी नाका चौकाजवळ हा अपघात घडला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
चांदमारी वाठोडा येथील बेलादेवीनगरात राहणारे भारतलाल रतनलाल टंडन (वय ४२) हे आज दुपारी मोटरसायकलने (एमएच ४९/ए ४०१५) जुना पारडी नाका चौकाकडून कळमन्याकडे जात होते. त्यांना भरधाव ट्रकचालकाने (एमएच ३१/ सीबी ८८२५) जोरदार धडक मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना मेयोत दाखल केले असता दुपारी २.३० ला डॉक्टरांनी मृत घोषित केले़ या अपघातामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. कळमना पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हे दाखल केले.
----

Web Title: A motorcyclist killed in a truck shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.