मोटारसायकलचे चाक लंपास
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30
अकोला: लहान उमरी गणेशनगरातील अपार्टमेंटमध्ये उभ्या असलेल्या मोटारसायकलचे समोरील चाक अज्ञात चोरट्याने गुरुवारी रात्रीच्या सुमारास लंपास केले. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला.

मोटारसायकलचे चाक लंपास
अ ोला: लहान उमरी गणेशनगरातील अपार्टमेंटमध्ये उभ्या असलेल्या मोटारसायकलचे समोरील चाक अज्ञात चोरट्याने गुरुवारी रात्रीच्या सुमारास लंपास केले. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. गणेशनगरातील अपेक्षा अपार्टमेंटमध्ये राहणारे मनोज अरुण सपकाळ (४१) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये त्यांची मोटारसायकल उभी केली होती. गुरुवारी रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्याने अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून त्यांच्या मोटारसायकलचे समोरील चाक लंपास केले. (प्रतिनिधी)000000000000000000000मोटारसायकल लंपास अकोला: राऊतवाडीतील पुंडलिकबाबा आश्रमाजवळील घरासमोरून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल लंपास केल्याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सप्तरंग अपार्टमेंटमध्ये राहणारे गणेश सदाशिव राहणे (४४) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी त्यांची एमएच ३0 एफ ६४0८ क्रमांकाची मोटारसायकल घरासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ३ ते ४ डिसेंबरदरम्यान त्यांची मोटारसायकल लंपास केली. (प्रतिनिधी)000000000000000000000