कोल्हापुरात मोटारसायकली पेटविल्या

By Admin | Updated: September 4, 2015 23:49 IST2015-09-04T23:49:43+5:302015-09-04T23:49:43+5:30

- अज्ञात हल्लेखोरांचे कृत्य

Motorbikes in Kolhapur | कोल्हापुरात मोटारसायकली पेटविल्या

कोल्हापुरात मोटारसायकली पेटविल्या

-
ज्ञात हल्लेखोरांचे कृत्य
कोल्हापूर : बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर येथे रस्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गुरुवारी मध्यरात्री पार्किंग केलेल्या तीन मोटारसायकलींसह कापड दुकानावर रसायने व पेट्रोल टाकून ते पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोन मोटारसायकली जळून खाक झाल्या; तर मोपेड व कापड दुकानातील किरकोळ साहित्य जळले. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला आहे का, त्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.
संजय व अशोक जयवंत राऊत हे बंधूंच्या दोन मोटारसायकली जळून मोठा आवाज झाला. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. राऊत यांच्या घरापासून काही अंतरावर आदित्य अहिराम शुक्ल यांच्या दारात पार्किंग केलेली पल्सर मोटारसायकलही जळत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी तिन्ही वाहनांची बारकाईने पाहणी केली असता त्याठिकाणी रसायन व पेट्रोलची दुर्गंधी येत होती. त्यावरून अज्ञातांनी रसायन व पेट्रोल टाकून वाहने जाळल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)
----
कापड दुकानही पेटविण्याचा प्रयत्न
सत्तुसिंग उगमसिंग राजपुरोहित (रा. प्रतिभानगर) यांच्या दुकानाच्या दारातील मॅटही जाळण्यात आले होते. आतील खुर्च्या व काही किमती कपडेही जळाल्याचे राजपुरोहित यांनी सांगितले.

Web Title: Motorbikes in Kolhapur