शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

मोटार बाईक रुग्णवाहिका ठरतेय आदिवासींसाठी वरदान!

By admin | Updated: February 20, 2016 02:48 IST

आधुनिक जगापासून पूर्णपणे अलिप्त छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना कठीण समयी वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध होणे

रायपूर : आधुनिक जगापासून पूर्णपणे अलिप्त छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना कठीण समयी वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध होणे तसे अवघडच. पण नव्यानेच सुरू झालेली मोटार बाईक रुग्णवाहिका मात्र त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे.राज्याच्या राजधानीपासून ४०० किलोमीटर दूर धानोरा आणि डोंगराळ भागातील ३५ गावांमध्ये जेथे पोहोचण्यास रस्तेही नाहीत ही मोटार बाईक अ‍ॅम्बुलन्स पोहोचली असून गरजूंवर मोफत औषधोपचार करण्यात येत आहे. ‘साथी’ नामक एका स्वयंसेवी संघटनेमुळे हे शक्य झाले आहे. संस्थेला या कार्यात युनिसेफचे सहकार्य लाभले आहे.साथीचे संस्थापक भूपेश तिवारी यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, आम्ही सर्वप्रथम या संपूर्ण परिसराचे सखोल अभ्यास केला. त्यानंतर आफ्रिकेतील दुर्गम भागात सुरू असलेल्या मोटारसायकल अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचे आॅनलाईन व्हिडिओ बघितले. अखेर विजयवाडातील एका अभियंत्याने आमची ही कल्पना प्रत्यक्षात साकारली. तिवारी गेल्या २५ वर्षांपासून बस्तर क्षेत्रात समाजसेवा करीत आहेत. या संपूर्ण क्षेत्रात जादूटोणा, मांत्रिक आणि बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. उपचारासाठी गावकऱ्यांंना घनदाट जंगलातून मार्ग काढीत अनेक कि.मी. दूर चालत जावे लागते. त्यामुळे येथे आरोग्याची गंभीर समस्या आहे. प्रामुख्याने नवजात बालक आणि माता मृत्यूचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त महिलांची प्रसूती आरोग्य केंद्रात होऊन हा मृत्यूदर कमी करणे हे आमचे लक्ष्य असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. केवळ दीड वर्षात मोटार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेने फार मोठा पल्ला गाठला असून २७२ लोकांचे जीव वाचविण्यात यश आले आहे. (वृत्तसंस्था)