शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Video - रात्री गर्लफ्रेंडला भेटायला आला बॉयफ्रेंड; कुटुंबीयांनी दोघांना बंद खोलीत पकडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 10:58 IST

एका तरुणाला त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गुपचूप येणं चांगलंच महागात पडलं आहे.

प्रेमासाठी अनेक लोक वाटेल ते करतात. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से देखील पाहायला मिळतात. बिहारमधील एका तरुणाला त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गुपचूप येणं चांगलंच महागात पडलं आहे. रात्री गर्लफ्रेंडला गुपचूप भेटण्यासाठी बॉयफ्रेंड आला पण कुटुंबीयांनी या दोघांना एका बंद खोलीत पकडलं आणि थेट लग्नच लावल्याची घटना समोर आली आहे. बिहारच्या मोतिहारीमध्ये प्रियकर-प्रेयसी यांचं जबरदस्तीने लग्न केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हरसिद्धी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. 

तुफान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण आणि तरुणीचा लग्न सोहळा पाहायला मिळत आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर रात्री तिच्या घरी पोहोचल्याचे सांगितले जात आहे. मुलीच्या घराजवळ अनोळखी गाडी उभी असल्याचे पाहून गावात एकच कुजबुज सुरू झाली. गावकऱ्यांनी मुलीच्या नातेवाईकांच्या मदतीने तिच्या घराची झडती घेतली. झडतीमध्ये एका बंद खोलीत प्रियकर-प्रेयसीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा गावातील एका मठात नेऊन गावकऱ्यांनी त्याचं लग्न लावून दिलं.

रात्री उशिरा झालेल्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हरसिद्धी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओल्हा मेहता टोला पंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमधील मिसिरिया मठात शुक्रवारी रात्री गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांचे लग्न लावून दिले. गावकरी आणि कुटुंबासमोर परस्पर संमतीने दोघेही विवाहाच्या बंधनात बांधले गेले.

गायघाट पंचायतीच्या बराहरपूर येथील रहिवासी राजेश राम यांचा मुलगा पवन कुमार याचे ओल्हा मेहता टोला पंचायतीच्या रामपुरवा मिसिरिया येथे राहणाऱ्या एका मुलीशी काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघे अनेकदा गुपचूप भेटत होते. रात्री कुटुंबीयांनी त्याला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. यानंतर दोघांनीही एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेऊन लग्न केल्याची चर्चा सुरू केली. त्याची संमती पाहून गावकऱ्यांनी शिवमंदिरात परस्पर संमतीने त्यांचे लग्न लावून दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार