मातृदिन विशेष

By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:39+5:302014-05-10T19:41:39+5:30

कलेला जागविणारी कलासक्त माता

Mother's Day Special | मातृदिन विशेष

मातृदिन विशेष

्यटन : सिंगापूर, मलेशिया, बॅँकॉकलाही प्राधान्य
नाशिक : उन्हाचा कडाका वाढत असताना सुरू झालेल्या सुट्यांमुळे नाशिककर सहलीचे नियोजन करीत असून, यातही जम्मू-काश्मीरला बहुतेकांची पसंती असल्याचे ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या रेकॉर्डवरून दिसते.
सध्या नाशिकमध्ये पार्‍याने चाळिशी गाठली आहे. शाळा आणि महाविद्यालयांना असलेल्या सुटीच्या हंगामामुळे अनेक कुटुंबांकडून सहलीचे आयोजन केले जात आहे. थंड हवेच्या ठिकाणांकडे त्यातही जम्मू-कामीरकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. यासाठी अनेक ट्रॅव्हल कंपन्यांनी खास पॅकेज सुरू केले आहे. त्याला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे.
एकेकाळी देशांतर्गत धार्मिक यात्रेनिमित्तच पर्यटन व्हायचे. त्यानंतर काही नैसर्गिक सहलीच्या निमित्ताने पर्यटन उद्योग नावारूपाला आला. आज या पर्यटन उद्योगाने मोठी भरारी घेतली असून, ट्रॅव्हल कंपन्यांनी खास योजना आखून सहलीची भुरळच पर्यटकांना घातली आहे.
मंुबई, पुणे आणि नाशिक असा नवा त्रिकोण विकासाच्या दृष्टीने साधला जात असताना, केवळ मंुबई- पुण्यातच असणार्‍या नामांकित ट्रॅव्हल कंपन्यांनी नाशकातही चांगले बस्तान बसविले आहे. या कंपन्यांनी परदेशी पर्यटनाला भरभराटीला आणण्यासाठी खास योजना राबविल्या. तसेच त्यांच्यातील वाढत्या स्पर्धेमुळे आर्थिकदृष्ट्या परदेश वार्‍या करणेही पर्यटकांना स्वस्त आणि सोपे झाले आहे.

बद्रीनाथ, केदारनाथसाठी
स्पेशल योजना
नाशिकमधील पर्यटकांचा जास्त ओढा दार्जिलिंग, जम्मू-काश्मीर, कुलू-मनाली या थंड प्रदेशांकडे आहे. याशिवाय दुय्यम स्वरूपात गुजरात, केरळ या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो. परदेशात सिंगापूर, मलेशिया, बॅँकॉक या ठिकाणांना प्राधान्य दिले जाते. काश्मीरसाठी ११, १५ आणि २० दिवसांसाठी सहल आयोजित केली जाते. बद्रीनाथ-केदारनाथला जाणार्‍यांची संख्या कमी आहे. तरीपण १० ट्रिप या सिझनमध्ये काढतोे. मग प्रवासी कमी असले तरी आम्ही त्यांना नेतोच.
- ब्रीजमोहन चौधरी
चौधरी यात्रा कंपनी

थंड प्रदेशांना प्राधान्य
उन्हाळ्याचा सिझन असल्याने सिमला, कुलू-मनाली, हिमाचल प्रदेश, काश्मीर, दार्जिलिंग भागात सहलीला जाण्यासाठी नाशिककर प्राधान्य देतात. यासाठी आम्ही त्या भागात सातत्याने सहलीचे आयोजन करीत असतो. रेल्वे आणि विमान सेवाही आम्ही देतो. कैलास मानस सरोवर यात्राही आयोजित करतो. त्यालाही नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
- अंकित सोनवणे,
दूर्वांकुर ट्रॅव्हल्स

काश्मीरमध्ये नाशिककर
राज्यात सुरू असलेला उन्हाचा तडाखा पाहता सध्या थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जाण्यासाठी नाशिककरांची पसंती दिसते आहे. जम्मू-काश्मीर आणि कुलू-मनाली येथे चांगला प्रतिसाद आहे.
- अंकित चौधरी, श्रीराम यात्रा

Web Title: Mother's Day Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.