विवाहाच्या आदल्यादिवशी 'नको त्या' अवस्थेत पाहिल्यानंतर आईकडून मुलीची हत्या
By Admin | Updated: March 14, 2016 14:16 IST2016-03-14T13:35:36+5:302016-03-14T14:16:45+5:30
दिल्लीच्या सीलमपूर भागामध्ये आईनेच मुलीची विवाहाच्या आदल्यादिवशी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

विवाहाच्या आदल्यादिवशी 'नको त्या' अवस्थेत पाहिल्यानंतर आईकडून मुलीची हत्या
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - दिल्लीच्या सीलमपूर भागामध्ये आईनेच मुलीची विवाहाच्या आदल्यादिवशी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री मुलीची आई घरी परतली तेव्हा तिने मुलीला आणि घरातल्या भाडेकरुला 'नको त्या' अवस्थेत पकडले.
मुलीच्या आईला समोर बघताच भाडेकरु तिथून कसाबसा निसटला पण चिडलेल्या आईने बिछान्यावरची उशी उचलून मुलीच्या तोंडवर दाबली. ज्यामध्ये गुदमरुन मुलीचा मृत्यू झाला. या मुलीचे दुस-या दिवशी लग्न होते. घर पाहुण्यांनी भरले होते.
मुलीचा मृत्यू झाल्याचे माहिती असूनही मुलीची आई आणि भाऊ मुलीने आत्महत्या प्रयत्न केला आहे असे सांगून तिला लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आले. मुलीची हत्या केल्यानंतर आईने भावाला घरी बोलवून घेतले व त्याला या संपूर्ण घटनेची माहिती दिली.
मुलीला ह्दयविकाराचा झटका आला म्हणून रुग्णालयात नेत आहोत असे तिने नातेवाईकांना सांगितले. रुग्णालयातील डॉक्टरांना गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना बोलवून घेतले. पोलिसांनी मुलीची आई आणि भावाला अटक केली आहे.
हे कुटुंब मेरठचे असून, गाझियाबादमधील एका व्यावसायिकाबरोबर मुलीचे लग्न ठरले होते. मुलीचे भाडेकरुसोबत प्रेम प्रकरण सुरु होते.