शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

TikTok व्हिडीओ बनवण्यासाठी आई आपल्या मुलीवर करत होती अत्याचार, पतीने उचललं 'हे' पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 21:56 IST

woman used to prank on the girl to make the video : पतीने सांगितले की, इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर प्रॅन्क व्हिडीओ बनवण्यासाठी त्याच्या पत्नीने ६ वर्षांच्या मुलीला इतके घाबरवले आहे की ती आता कोणाजवळ जाऊ इच्छित नाही.

ठळक मुद्देत्या व्यक्तीने सांगितले की, त्याची पत्नी स्वच्छता आणि स्वयंपाकघर यासारख्या घरगुती कामांचे लहान व्हिडिओ बनवते आणि त्यांना टिकटॉकवर पोस्ट करते.

नवी दिल्ली - आजकाल काही लोक सोशल मीडियाचे इतके वेडे झाले आहेत की, त्यांना समोर काय घडतंय हे काही दिसत नाही. असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका पतीने सोशल मीडिया साईट Reddit वर लिहिले की, तो आपल्या पत्नीवर नाराज आहे आणि जर हे असेच चालू राहिले तर त्याला घटस्फोट घ्यावा लागेल. पतीने सांगितले की, इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर प्रॅन्क व्हिडीओ बनवण्यासाठी त्याच्या पत्नीने ६ वर्षांच्या मुलीला इतके घाबरवले आहे की ती आता कोणाजवळ जाऊ इच्छित नाही.घरी बनवलेला व्हिडिओत्या व्यक्तीने सांगितले की, त्याची पत्नी स्वच्छता आणि स्वयंपाकघर यासारख्या घरगुती कामांचे लहान व्हिडिओ बनवते आणि त्यांना टिकटॉकवर पोस्ट करते. काही दिवसांपासून तिने मुलीसोबत खोड्या करण्यास सुरुवात केली, नंतर मुलीला बनावट भुत बनवून घाबरवले. मुलगी घाबरून रडू लागली. एवढं सगळं करूनही ती बाई हसत होती. त्या व्यक्तीने यासाठी आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही. त्रासलेल्या पतीने रेडिटवर आपले दुःख शेअर केले आणि लिहिले की, त्याची ६ वर्षांची मुलगी इतकी घाबरली आहे की ती आता तिच्या खोलीत एकटी झोपू शकत नाही.समुपदेशन नाकारलेजेव्हा पतीने आपल्या काही फॉलोअर्सच्या मनोरंजनासाठी मुलांसोबत अशा खोड्या करणे थांबवण्यासाठी पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा या प्रकरणावरून महिलेने तिच्या पतीशी भांडण केले, पतीने सांगितले की त्याच्या पत्नीला काही हजार फॉलोअर्स मिळाले आहेत, त्यानंतर ती बदलली आहे. तिने यासाठी समुपदेशन करण्यासही नकार दिला. आता मुलाच्या कल्याणासाठी, पतीकडे फक्त घटस्फोटाचा मार्ग शिल्लक आहे.लोकांनी प्रतिक्रिया दिल्यारेडिटवर लिहिलेल्या या पोस्टवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने पोस्टला उत्तर देताना लिहिले की, महिलेची अशी वृत्ती निंदनीय आहे. हे बाल अत्याचार आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, विनोदांना त्यांची जागा आहे, परंतु अशा मुलांना घाबरवून व्हिडिओ बनवणे खूप चुकीचे आहे. बऱ्याच लोकांनी सांगितले की, टिकटॉक मुलांपेक्षा जास्त महत्वाचे नाही, या महिलेवर कारवाई झाली पाहिजे.पत्नीच्या वागण्यामुळे व्यथित झालेल्या पतीने काही काळानंतर रेडडिटवर दुसरी पोस्ट टाकली ज्यात त्याने सांगितले की, त्याने या प्रकरणावर पत्नीशी बोलणं केलं आहे. पत्नीने तिच्या चुकीच्या वृत्तीबद्दल माफी मागितली आहे.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकNew Delhiनवी दिल्लीSocial Mediaसोशल मीडिया