शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

"मातृभाषा आईसारखी, तर हिंदी आपल्या आजीसारखी"; भाषा वादावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 23:29 IST

"भाषेचे राजकारण सोडून पुढच्या पिढीच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. हिंदी नाकारणे म्हणजे भविष्यातील संधींचे दरवाजे बंद करण्यासारखे आहे. हिंदी स्वीकारल्याने रोजगार आणि शिक्षणाचे नवे मार्ग खुले होतील."

शिक्षण, रोजगार आणि व्यवसाय आदी क्षेत्रांत हिंदीचा प्रभाव सतत्याने वाढत आहे. यामुळे तिला आंधळा विरोध करणे योग्य नाही, जनतेने भाषेबद्दलची संकुचित विचारसरणी सोडून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला हवी, असे आवाहन आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केले आहे. ते हैदराबादमधील गच्चिबावली येथील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर आयोजित राज्य भाषा विभागाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात बोलत होते.

तमिळ असूनही हिंदीवर प्रेम करायचे अब्दुल कलाम -पवन कल्याण म्हणाले, "आपण परदेशात जातो आणि तेथील भाषा शिकतो, मग हिंदीची एवढी भीती का? आपण इंग्रजी सहज बोलतो, मग हिंदी बोलण्यात संकोच का? माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे तामिळ असूनही त्यांचे हिंदीवर प्रेम होते.

ते पुढे म्हणाले "आपण सांस्कृतिक अभिमानाला भाषिक कट्टरतेशी जोडू नये. मातृभाषा आपल्या आईसारखी आहे, तर हिंदी आपल्या आजीसारखी आहे. दुसरी भाषा स्वीकारल्याने आपली ओळख संपत नाही, उलट आपल्याला एकत्रितपणे पुढे जाण्याची संधी मिळते."

हिंदी नाकारणे भविष्यासठी धोक्याचे -पवण कल्याण पुढे म्हणाले, "भाषेचे राजकारण सोडून पुढच्या पिढीच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. हिंदी नाकारणे म्हणजे भविष्यातील संधींचे दरवाजे बंद करण्यासारखे आहे. हिंदी स्वीकारल्याने रोजगार आणि शिक्षणाचे नवे मार्ग खुले होतील."

आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय म्हणजे संधी - आंध्र प्रदेश सरकारने नुकताच शाळांमध्ये हिंदीला पर्यायी विषय म्हणून प्रोत्साहन देण्याची योजना जाहीर केली आहे. पवन कल्याण यांनी या उपक्रमाचे समर्थन केले. तसेच, "हे पाऊल तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक बनवेल. सरकार हिंदी शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून दर्जेदार शिक्षण सुनिश्चित होईल."

यावेळी त्यांनी, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांना भाषेला विभाजनाचे नव्हे तर एकतेचे माध्यम बनवण्याचे आवाहनही केले. हा कार्यक्रम हिंदी भाषेचा प्रचार आणि संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशhindiहिंदी