शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आई रुग्णांसाठी जेवण बनवतेय अन् चिमुकला डब्ब्यावर लिहतोय 'खूश रहिए'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 12:08 IST

वर्तमानपत्र, सोशल मीडिया आणि मीडियावरील बातम्यांमधून मन सुन्न होत आहे. रुग्णालयात चाललेली धावपळ, रुग्णवाहिकेचा आवाज, नातेवाईकांचे अश्रू आणि स्मशानातील गर्दी पाहून मनावर आघात होत आहे

ठळक मुद्देट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर हा फोटो व्हायरल झाला आहे. त्यासोबत, 'या मुलाची आई रुग्णालयात दाखल रूग्णांसाठी जेवण बनवते ! आणि हा लहानगा फूड पॅकेटवर लिहित आहे... खूश रहिए... असे कॅप्शन देण्यात आलंय.

मुंबई - कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी देश एकवटला असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वचजण आपलं योगदान देत आहेत. देशातील बड्या उद्योगपतींनीही कोविडच्या संकटात देशाला मदत केली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्संही मदतीसाठी पुढे आले आहेत. गोरगरिब रुग्णांसाठी अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थानीही पुढाकार घेतला आहे. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डब्बे पुरविण्यातही अनेकजण आपल योगदान देत आहे. या कठिणप्रसंगात लहान मुलेही मागे नाहीत. सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

वर्तमानपत्र, सोशल मीडिया आणि मीडियावरील बातम्यांमधून मन सुन्न होत आहे. रुग्णालयात चाललेली धावपळ, रुग्णवाहिकेचा आवाज, नातेवाईकांचे अश्रू आणि स्मशानातील गर्दी पाहून मनावर आघात होत आहे. मात्र, अशा घटनांमध्येही एखादी सकारात्म बातमी मनावरील मरगळ दूर करते. आपल्या मनावरील ताण हलका करते. या संकटाला तोंड देण्याची ताकद, ऊर्जा देते. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसोबत असलेलं कॅप्शन वाचून, आपण ही लढाई नक्कीच जिंकू असा विश्वास निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.  ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर हा फोटो व्हायरल झाला आहे. त्यासोबत, 'या मुलाची आई रुग्णालयात दाखल रूग्णांसाठी जेवण बनवते ! आणि हा लहानगा फूड पॅकेटवर लिहित आहे... खूश रहिए... असे कॅप्शन देण्यात आलंय. आपल्या समोर असलेल्या टेबलवरील जेवणाच्या पॅकेटवर हा मुलगा खूश रहिए असं लिहत आहे. या चिमुकल्याचा छोटासा संदेश रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आधार देणारा आहे. तसेच, कोरोनाच्या लढाईत आपण जिंकू हा विश्वास निर्माण करणारा आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलViral Photosव्हायरल फोटोज्Social Mediaसोशल मीडिया