शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने सहा वर्षाच्या मुलीची गळा कापून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 10:29 IST

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने भीतीपोटी महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमधील गाजीपूर येथे ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

ठळक मुद्देप्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने भीतीपोटी महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटनापोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहेमुलीने आपण जे पाहिलं ते वडिलांना सांगण्याची धमकी दिल्यानंतर दोघांनी मिळून हत्येचा कट रचला असल्याची पोलिसांची माहिती

नवी दिल्ली - प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने भीतीपोटी महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमधील गाजीपूर येथे ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. शेजा-यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांना महिलेच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर कारवाई करत आरोपी महिला आणि तिचा प्रियकर सुधीर यांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त (पूर्व) ओमवीर सिंग यांनी दिली आहे. 

'मुलीने आपण जे पाहिलं ते वडिलांना सांगण्याची धमकी दिल्यानंतर दोघांनी मिळून हत्येचा कट रचला', असं ओमवीर सिंग यांनी सांगितलं आहे. आरोपी महिला आपला पती आणि तीन मुलांसोबत राहत होती. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती. तिचा पती रोजंदारीवर काम करतो. आरोपी सुधीर हादेखील कामगार असून त्यांच्या शेजारीच राहायचा. आरोपी महिलेने आपल्या मुलांना तुमच्या बहिणीला भूत घेऊन गेल्याची खोटी माहिती दिली होती. 

'गेल्या अनेक दिवसांपासून दोघांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. मुलीने सुधीरसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर बुधवारी संध्याकाळी तिने मुलीच्या हत्येचा कट रचला. महिलेने मुलीचे हात धरले आणि सुधीरने तिचा गळा कापला. चौकशीदरम्यान दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे', असं ओमवीर सिंग म्हणाले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'महिलेचा पती दारु पिण्यासाठी घराबाहेर गेला असताना प्रियकर सुधीर घरात शिरला. दोघेजण तिला घेऊन शेजा-यांच्या गच्चीवर गेले आणि हत्या केली. हत्या झाली तेव्हा दोन्ही मुलं घरात बसून टीव्ही पाहत होते'.  पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त केला आहे. 

हत्या केल्यानंतर सुधीर तेथून निघून गेला आणि आरोपी महिलेने मुलगी बेपत्ता झाल्याची आरडाओरड सुरु केली. यानंतर आपल्या पती आणि शेजा-यांसोबत मिळून मुलीचा शोध घेण्याचं नाटक सुरु केलं. पोलिसांनाही रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्याचा कॉल गेला. यानंतर पोलिसांनीही शोध सुरु केला. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास गच्चीवर मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. 

'चौकशीदरम्यान मुलीची आई शांत होती. पण शेजा-यांनी आम्हाला तिच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती दिल्यानंतर आमची संशय वाढला. कसून चौकशी केली असता महिला आणि तिचा प्रियकर सुधीरने गुन्हा कबूल केला', अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा