शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:33 IST

अहमदाबादमध्ये विमान कोसळल्यानंतर आजूबाजूच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबाद विमान अपघातात काही सेकंदातच २४१ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अहमदाबादवरुन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेतल्यानंतर एका इमारतीवर कोसळले या अपघातानंतर विमान प्रवाशांसह २६५ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या मेस इमारतीला धडकल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे इमारतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विमान कोसळ्यानंतर आगीमुळे आजूबाजूचा परिसर भस्मसात झाला. त्यामुळे तिथल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान एआय-१७१ कोसळले. या अपघातात विमान प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २४२ प्रवासी होते, त्यापैकी १६९ भारतीय, ७३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. अहमदाबादच्या मेगाणीनगर भागात झालेल्या विमान अपघातानंतरचे दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडाला. पण या भयानक घटनेत एका आईच्या कृत्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. ती आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंज देत होती.  

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, जिथे विमान कोसळले तिथे एक आई तिच्या १५ वर्षांच्या मुलासह उपस्थित होती. जेव्हा अपघात झाला तेव्हा सीता पटणी नावाची महिला मुलासह आगीत उडकली. अपघातानंतर, आई अस्वस्थ अवस्थेत रस्त्यावर धावताना दिसत आहे. विमान कोसळताच, एक प्रचंड आगीचा भडका उडाला. त्यात सीता यांच्या १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

पण सीता पटानी शेवटपर्यंत त्यांच्या मुलाला आगीपासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. या प्रयत्नात तीही गंभीरपणे भाजली. याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये त्या मुलाला वाचवण्यासाठी रस्त्यावर धावताना दिसत आहे. त्यांच्या पाठीमागे विमान जळताना दिसत आहे.

दरम्यान, गुरुवारी १२ जून २०२५ रोजी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ उड्डाणानंतर लगेचच मेघनीनगर परिसरात कोसळले. या अपघातात २६५ जणांना आपला जीव गमवावा लागला. पूर्णपणे इंधन भरलेले बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान अपघातानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादAccidentअपघातGujaratगुजरात