शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

चॉकलेट, स्वीट्स, इअरप्लग्स आणि 'ती गोड चिठ्ठी'... चिमुकल्याच्या आईनं जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 4:00 PM

देव करोना नामक एका प्रवाशी महिलने या विनयशील मातेचे तिच्या बाळासोबतचे मिठाई वाटतानाचे विमानातील फोटो फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

बाळाला घेऊन प्रवास करणं हे आईसाठी मोठं जिकरीचं काम असतं. मात्र, आईला ते करावचं लागतं, कारण आपल्या तान्हुल्याला सोडून आई राहू शकत नाही अन् आईला सोडून ते बाळही गप्प बसत नाही. मग, तो प्रवास बसच असो, ट्रेनचा असो किंवा प्लेनचा असो. अशाचा एका विमान प्रवासातील आई अन् तिच्या चिमुकल्याची गोष्ट विमानातील प्रवाशांनाही भावूक करुन गेली. आई-मुलाच्या या प्रवासात एक गोड अनुभव प्रवाशांना आला. या प्रवासात एक आई आपल्या 4 महिन्याच्या मुलासह सॅन फ्रॅन्सिस्कोला विमानातून जात आहे. 

सॅन फ्रॅन्सिस्कोच्या दिशेने निघालेल्या या आईने विमानातील 200 प्रवाशांना मिठाईचा बॉक्स आणि एअर प्लग वाटल्यानं प्रवाशीही आश्चर्यचकित झाले. मात्र, या भेटवस्तूसोबत असलेली एक गोड चिठ्ठी प्रवाशांना भावूक करुन गेली. या चिठ्ठीतील मजकुराने विमानातील प्रत्येक प्रवाशांतील ममता जागली. या विमानप्रवासात आपला मुलगा जुनवो जर रडायला लागला, तर सहकारी प्रवाशांना त्रास होऊ नये, म्हणून या माऊलीने ही शक्कल लढवली. 

देव करोना नामक एका प्रवाशी महिलने या विनयशील मातेचे तिच्या बाळासोबतचे मिठाई वाटतानाचे विमानातील फोटो फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. मात्र, या मिठाई बॉक्ससोबत दिलेली गोड चिठ्ठी प्रवाशांच्या काळजाला हात घालते. या चिठ्ठीतून चक्क तो 4 महिन्यांचा चिमुकलाच विमानातील प्रवाशांसी संवाद साधत आहे. 

''हॅलो, मी जुनवो बोलतोय, आता माझे वय 4 महिने आहे. मी आज माझ्या आई अन् आजीसह अमेरिकेला आत्यांकडे जातोय. मी थोडासा उदास आहे, कारण हा माझा पहिलाच विमानप्रवास आहे. त्यामुळे या प्रवासात मी कदाचित रडू शकतो किंवा गोंधळही घालण्याची शक्यता आहे. मी शांतपणेच हा प्रवास करणार आहे. पण, याबाबत मी वचन देऊ शकत नाही, म्हणून आपण मला माफ कराल ही अपेक्षा. म्हणूनच माझ्या आईने तुमच्यासाठी एका खाऊची पिशवी आणली आहे. त्यामध्ये एक ईअर प्लग आणि कँडी आहे. जर, मी विमानात तुम्हाला त्रास दिला, रडून गोंधळ केला, तर तुम्ही त्याचा वापर करा. एन्जॉय ट्रीप...'' आपला आभारी आहे. 

अशा स्वरुपातील गोड चिठ्ठी जुनवोने विमानातील सहकारी प्रवाशांसाठी लिहिली आहे. त्यामुळे ही चिठ्ठी वाचल्यानंतर कुणीही जुनवोचा कितीही त्रास सहन करेल हे नक्की. विमानातील प्रवाशांनी आईच्या या भेटवस्तूचा आदरपूर्वक स्विकार करत, मातेचं कौतुक केलं आहे. सहकारी प्रवाशांची काळजी घेणारी हा माऊली खरंच धन्य, तर किती गोड... अशा कमेंटही अनेकांनी केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

टॅग्स :airplaneविमानAmericaअमेरिकाpassengerप्रवासीMothers Dayमदर्स डेViral Photosव्हायरल फोटोज्