शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! एकीकडे लेकीचं लग्न अन् दुसरीकडे आईचा मृत्यू; कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 14:24 IST

मुलीची वरात निघाल्यानंतर आईची अंत्ययात्रा बाहेर काढण्यात आली आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.

झारखंडच्या बगोदर येथील शिवमंदिर हरिहरधाममध्ये एका दाम्पत्याने अत्यंत कठीण परिस्थितीत लग्नगाठ बांधली. शोकाकुल वातावरणात लग्नाचे सर्व विधी पार पडले. मुलीच्या आईच्या आकस्मिक निधनानंतर हा विवाह झाला. दु:खाच्या वातावरणात लग्न पार पडल्याने नवरदेवाच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना वधूच्या चेहऱ्यावर. लग्नसोहळ्याला पोहोचलेल्या प्रत्येकाचे चेहरेही कोमेजले होते आणि लोकांना लग्नाचे विधी लवकर पूर्ण करण्याची घाई होती.

मुलीच्या आजारी आईच्या आकस्मिक निधनामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि उत्साह उरला नाही. मुलीची वरात बाहेर काढल्यानंतर, आईची अंत्ययात्रा निघाली. आईचा मृतदेह घरी ठेवून मुलीचा विवाह हरिहरधाम मंदिरात घाईघाईत पार पडला. मुलीची वरात निघाल्यानंतर आईची अंत्ययात्रा बाहेर काढण्यात आली आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण बागोदर ब्लॉकच्या बनपुरा गावाशी संबंधित आहे. 

बानपुरा येथील रहिवासी असलेल्या सावित्री देवी बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या, गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांची धाकटी मुलगी काजल कुमारी हिचे लग्न 10  मे रोजी निश्चित झाले होते. आईच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी आईचा मृतदेह घरी ठेवून मुलीचे लग्न लावून देण्याचा मोठा निर्णय घेतला.

काजलचा विवाह मंझलाडीह येथील मोहन दास याच्याशी झाला होता. लग्नानंतर मुलगी पाठवणी झाल्यावर सासरी गेली. यानंतर आईचे पार्थिव बाहेर काढण्यात आले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान पोहोचलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न