भीषण आपघातात आई व मुलाचा मृत्यू

By Admin | Updated: December 7, 2015 00:03 IST2015-12-07T00:03:10+5:302015-12-07T00:03:10+5:30

भीषण अपघातात आईसह मुलाचा मृत्यू

Mother and child die in a horror | भीषण आपघातात आई व मुलाचा मृत्यू

भीषण आपघातात आई व मुलाचा मृत्यू

षण अपघातात आईसह मुलाचा मृत्यू
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर येथील इच्छामणी लॉन्ससमोर रविवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास दुचाकीला पाठीमागून ट्रेलरने दिलेल्या धडकेत आईसह मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत सुदैवाने हेल्मेट परिधान केले असल्यामुळे या कुटुंबातील पित्याला जीवदान मिळाले.
इंडिया सिक्युरिटी प्रेस येथे कार्यरत असलेले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान नानासाहेब बडे हे रविवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास पत्नी व मुलासह नाशिकहून नाशिकरोड परिसराकडे दुचाकी (क्र. एमएच. ४६ एम. ९२६०)ने येत होते. उपनगरनाका येथील इच्छामणी लॉन्ससमोर त्यांच्या वाहनाला पाठीमागून भरधाव येणार्‍या १० चाकी ट्रेलर(क्र. एमएच. १५ बीके. ०१६९) या अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने पत्नी मीनल बडे (३२) व मुलगा संस्कार बडे (९) हे चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. तर हेल्मेट परिधान केलेले नानासाहेब बडे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या या घटनेमुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)

Web Title: Mother and child die in a horror