आईनेच 2 वर्षाच्या मुलाला फेकले जीन्यावरुन

By Admin | Updated: January 27, 2017 18:36 IST2017-01-27T17:36:57+5:302017-01-27T18:36:09+5:30

राजधानी दिल्लीमधील एक धक्कादायक घटना सीसीटिव्हीच्या माध्यमातून समोर आली आहे.

Mother 2 year old boy thrown out | आईनेच 2 वर्षाच्या मुलाला फेकले जीन्यावरुन

आईनेच 2 वर्षाच्या मुलाला फेकले जीन्यावरुन

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - राजधानी दिल्लीमधील एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली आहे. दिल्लीमधील प्रल्हादपूर भागात एका महिलेने दोन वर्षाच्या पोटच्या मुलाला जीन्यावरुन खाली फेकले. या धक्कादायक घटनेनंतर महिलेच्या पतीनं पोलीस स्थानकात तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 21 जानेवारी रोजी संध्याकाळी ही घटना घडली आहे. यानंतर 24 जानेवारी रोजी पती-पत्नीचे जोरदार भांडण झाले होते. मदतीसाठी पीसीआरला फोन करण्यात आला होता. या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर त्यांना सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  

दरम्यान, या घटनेत 2 वर्षाचा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या अंगावर मारहाणीच्या खुणाही आढळून आल्या आहेत. घटनेच्या चार दिवसांनंतरही महिलेला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.

24 जानेवारी रोजी पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलाचे वडील नितिन गुप्ता यांनी सांगितले की, पत्नी सोनू गुप्तासोबत घरगुती वाद-विवाद होता. 21 तारखेला सोनू आणि आई-बाबांमध्ये भांडण झाले. त्यावेळी रागात सोनूने पहिल्यांदा सर्व कपडे फेकले, त्यानंतर दोन वर्षाच्या अंशुलला पाय-यांवरुन बाहेर फेकून दिले. मुलाला फेकल्याची सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  

पाच वर्षापूर्वी नितिन आणि सोनू यांनी घरच्यांच्या विरोधानंतरही प्रेमविवाह केला. लग्नानंतर चार महिन्यातच दोघांमध्ये सतत भांडणं होऊ लागली, अशी माहिती नितिन गुप्ताच्या वडिलांनी दिली आहे.

Web Title: Mother 2 year old boy thrown out