शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

देशातील या राज्यांत मिळतो सर्वाधिक पगार आणि सुट्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 16:48 IST

जर तुम्ही भारताची राजधानी दिल्लीत नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

नवी दिल्ली- जर तुम्ही भारताची राजधानी दिल्लीत नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार, मुंबईच्या तुलनेत नवी दिल्लीत काम केल्यास तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. परंतु दिल्लीत तुम्ही नोकरी करत असल्यास तुम्हाला सुट्ट्या फार कमी प्रमाणात मिळतात.सुट्ट्यांसाठी मुंबई सर्वात चांगलं ठिकाण आहे. मुंबईतल्या कंपन्या दिल्लीतील कंपन्यांपेक्षा नोकरदारांना जास्त सुट्ट्या देतात. मात्र तुम्हाला जास्त पगार हवा असल्यास तुम्ही नवी दिल्लीलाच प्राथमिकता द्याल. नवी दिल्लीत मिळणारा जास्त पगार हा मुद्दा गौन असून, मुंबईतले नोकरदार हे अधिक कौशल्यपूर्ण काम करत असल्याचा निष्कर्षही वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमधून मांडण्यात आला आहे. दिल्लीत मुंबईच्या तुलनेत 60 टक्के जास्त पगार मिळतो. नवी दिल्लीतल्या एखाद्या सुपरमार्केटमधल्या कॅशिअरलाही कमीत कमी महिन्याला 14 हजार रुपये पगार मिळतो. तर त्या तुलनेत मुंबईत अशा प्रकारचं काम करणा-याला 8650 रुपये इतका महिन्याकाठी पगार मिळतो. तो पगार दिल्लीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी कमी आहे.मुंबईतल्या कंपन्या 21 सुट्ट्या भरपगारी देतात. तर दिल्लीत फक्त 15 सुट्ट्या भरपगारी मिळतात. दिल्लीतल्या कामगारांना जास्त पगार असल्यामुळे जास्त दिवस काम करावं लागतं. परंतु सुपरमार्केटमधल्या कामाचं मूल्यमापन केल्यास दिल्लीच्या तुलनेत मुंबईत काम करणा-याला जास्त फायदा मिळतो. मुंबईत किमान वेतन इतर विकसनशील देशांच्या तुलनेत फार कमी आहे. जसं की मॅक्सिको सिटी(152डॉलर), व्हिएतनाम (168 डॉलर), कुवेत (199 डॉलर) आहे. तसेच बँकॉक, शांघाई, जकार्ता, क्वालालांपूर व मनीला या देशांतील मजुरीही तुलनेत जास्त आहे. 

सध्या देशात नोकऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. आधी नोकरीच मिळत नाही आणि मिळाली तर अनेकांचा पगार कमी असतो. संपूर्ण वर्षभर काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला कंपनीतर्फे वर्षाला होणारी पगारवाढ मिळेलच,याची शाश्वती नसते आणि ती मिळालीच तर अगदी तटपुंजी असते. पण भारतातल्या अशा काही कंपन्या आहेत त्या वर्षाला नव्हे, तर प्रत्येक महिन्याला पगारवाढ देतात. ही कदाचित तुम्हाला चेष्टा वाटेल पण हे वास्तव आहे. कामात आधिक लवचिकता आणण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना महिन्याला पगारवाढ देणाऱ्या या कंपनीचे नाव कोका-कोला इंडिया असे आहे. कोका-कोला इंडियाने ग्लोबल व्हिजनशी ताळमेळ बसवत परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्ये बदल केला आहे. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा पगारवाढ देत आहे.नव्या बदलानंतर कोका कोला इंडियाच्या व्यवस्थापकांवर वार्षिक कामगिरी पुनरावलोकन पूर्ण करण्यासाठी कोणताही दबाव नसणार आहे. कोका-कोला कंपनीने मंथली फिडबॅक मॅकेनिजनसाठी हे बदल केले आहेत. कंपनीच्या कर्मचार्यांकडून कामात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाचे व्हीपी-एचआर मनु नारंग वाधवा यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले की, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी लोकांना एकत्र करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की फ्रेमवर्कमध्ये लवचिकता सर्वांना आपले सर्वोत्तम देण्यास सक्षम करते. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीMumbaiमुंबई