शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath : मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला डास, महापौरांनी मारला; योगी आदित्यनाथ म्हणाले,"...यावर उपाय करावे लागतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 08:44 IST

Yogi Adityanath : राज्यात कोरोना कमी होत असतानाच आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झिका व्हायरससंदर्भातील नियंत्रण कक्ष पाहण्यासाठी मुख्यमंत्री कानपूरला पोहोचले होते. 

कानपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान कानपूरला पोहोचले असता येथील एक डास मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यामुळे परिस्थिती अधिकाऱ्यांसाठी अस्वस्थता निर्माण करणारी झाली होती. मात्र, हा डास महापौरांनी तातडीने मारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवत सांगितले की, हे डास असे मरणार नाहीत, त्यांच्यावर उपाय करावे लागतील. दम्यान, राज्यात कोरोना कमी होत असतानाच आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झिका व्हायरससंदर्भातील नियंत्रण कक्ष पाहण्यासाठी मुख्यमंत्री कानपूरला पोहोचले होते. 

महापालिकेचा पर्दाफाशमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यापूर्वी सर्व प्रशासकीय कर्मचारी तीन दिवस बंदोबस्तात व्यस्त होते. मुख्यमंत्र्यांसमोर कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते, मात्र एका डासाने येथील महापालिकेचा पर्दाफाश केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने डास मारण्यासाठी संपूर्ण मार्गावर फॉगिंग आणि सॅनिटायझेशन केले होते. महापालिका, स्मार्ट सिटी ऑफिस आणि केडीएमध्ये एकही डास येऊ नये म्हणून प्रत्येक भाग स्वच्छ केला, तरीही डास मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले.

महापौरांनी डास लगेच मारलादरम्यान, मुख्यमंत्री जेव्हा स्मार्ट सिटी मिशन कार्यालयात झिका व्हायरससंदर्भातील नियंत्रण कक्ष पाहण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे, औद्योगिक विकास मंत्री सतीश महाना आणि वैद्यकीय आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह हे महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील कार्यालयात जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेले. त्यावेळी एक डास मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला. हा डास पाहताच महापौरांनी त्याला मारला. यावर मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरता आले नाही आणि डास असे मरणार नाहीत, त्यांच्यावर उपाय करावे लागतील, असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांपर्यंत डास पोहोचल्याची बातमी व्हायरल कानपूर शहरासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या डेंग्यूचा कहर थांबत नाही आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिकांना फॉगिंग आणि साफसफाईच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांच्या उपचारात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी मुख्यमंत्री स्वत: लक्ष ठेवून आहेत. पण कानपूरमध्ये लोक मुख्यमंत्र्यांपर्यंत डास पोहोचल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल करत आहेत. याला स्वच्छतेच्या दुरवस्थेशी जोडून लोक महापालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

झिका व्हायरस कशामुळे होतो?झिका हा आजार एडीस एजिप्ती नावाच्या डास चावल्याने हे वायरल इन्फेक्शन होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यातही हा डास आधी इन्फेक्टेड असेल आणि तो जर चावला तर त्यातून हा आजार होत असतो. डेंग्यू व्हायरसप्रमाणेच याची लक्षणे दिसून येतात. आफ्रिकेमधून हा आजार भारतात आल्याचे म्हटले जाते. ज्या डासामध्ये याचा प्रसार झालेला असतो, तो डास माणसाला चावल्यास त्यातून या आजाराची लागण होत असते. हे वायरल इन्फेक्शन असल्याने त्यावर वेगळे असे उपचार काहीच नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी फवारणी करणे, पाणी साचू न देणे आदी उपाय करणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश