मशीद हे धार्मिक स्थळ नाही
By Admin | Updated: March 15, 2015 23:16 IST2015-03-15T23:16:56+5:302015-03-15T23:16:56+5:30
मशीद हे धार्मिक स्थळ नाही. ते कधीही आणि कशासाठीही पाडता येते, असे विधान करून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.

मशीद हे धार्मिक स्थळ नाही
नवी दिल्ली/गुवाहाटी : मशीद हे धार्मिक स्थळ नाही. ते कधीही आणि कशासाठीही पाडता येते, असे विधान करून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. दरम्यान, हे प्रक्षोभक विधान केल्याबद्दल स्वामींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच, ते स्वत:चा बचाव करताना दिसले.
शनिवारी आसामातील गुवाहाटी येथील कार्यक्रमात स्वामींनी उपरोक्त वादग्रस्त वक्तव्य केले होते. मशीद हे धार्मिक स्थळ नाही. ती साधी इमारत आहे. ती कधीही पाडता येते. कुणी माझ्या या विधानाशी अहसमत असेल तर मी चर्चेला तयार आहे, असे स्वामींनी म्हटले होते. सौदी अरेबियात रस्ते बांधण्यासाठी मशिदी पाडण्यात आल्या, असा हवालाही त्यांनी दिला.
स्वामींच्या या विधानावर देशभर तीव्र पडसाद उमटले. अनेक मुस्लिम संघटना त्यांच्या विरोधात उतरल्या. कृषक मुक्तिसंग्राम समितीने स्वामींविरोधात गुवाहाटीत पोलीस तक्रार दाखल केली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)