सेक्स रॅकेट प्रकरणात मोरोक्कोच्या मॉडेलचा शोध

By Admin | Updated: July 24, 2016 02:12 IST2016-07-24T02:12:19+5:302016-07-24T02:12:19+5:30

येथे उघडकीस आलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणात मोरोक्कोच्या एका मॉडेलचे नाव समोर आले आहे. पी.एन. संन्याल आणि त्याच्या साथीदारांकडून चालविण्यात येत असलेल्या

The Moroccan model was discovered in the sex racket case | सेक्स रॅकेट प्रकरणात मोरोक्कोच्या मॉडेलचा शोध

सेक्स रॅकेट प्रकरणात मोरोक्कोच्या मॉडेलचा शोध

नवी दिल्ली : येथे उघडकीस आलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणात मोरोक्कोच्या एका मॉडेलचे नाव समोर आले आहे. पी.एन. संन्याल आणि त्याच्या साथीदारांकडून चालविण्यात येत असलेल्या या रॅकेटमध्ये ही मॉडेल महिला प्रमुख भूमिका बजावीत होती, अशी माहिती आहे.
संन्याल याच्या चौकशीतून या मॉडेलचे नाव समोर आले. तिची ओळख पटविणारी काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, ही महिला संन्यालकडे सातत्याने येत असे. तसेच त्याच्या एका साथीदाराच्या मालकीच्या फार्महाऊसवरही तिचे येणे-जाणे होते. आरोपीच्या मालकीच्या ट्रॅव्हल संस्थेची देखरेख ती करीत होती. तसेच मुली आणि ग्राहक यांच्या भेटी घडवून आणण्याचे कामही करीत होती. एफआयआरमध्ये विदेशी नागरिक कायद्याचे कलम १४ लावण्यात आले आहे. विदेशी नागरिकांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्याचा आरोप संन्यालवर ठेवण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

पीएमओच्या नावाचा वापर
संन्याल हा आपण पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करीत असे. त्याच्याकडे सपा खासदार नरेश अग्रवाल आणि भाजपा खासदार जगदंबिका पाल यांचे लेटरहेडस् आढळून आल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. तथापि, त्याच्याशी राजकीय नेत्यांचा कोणताही संबंध नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी स्पष्ट केले.

Web Title: The Moroccan model was discovered in the sex racket case