शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

राज्यात अडीच हजारांहून अधिक रुग्ण, १८ मृत्यूंची नोंद, एकूण १८४ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 06:31 IST

नव्या ३५० रुग्णांची भर, मुंबईत सर्वाधिक; २५९ जण बरे होऊन घरी परतले

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा अडीच हजारांहून अधिक झाला आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर संसर्ग संक्रमण रोखण्याचे आव्हान गडद होते आहे. राज्यात मंगळवारी ३५० रुग्णांचे निदान झाले, यात सर्वाधिक रुग्ण २०४ मुंबईतील आहेत. यामुळे राज्याची रुग्णसंख्या २ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर मंगळवारी राज्यात १८ मृत्यूंची नोंद झाली, त्यातील ११ मुंबईत असून राज्याचा मृतांचा आकडा १७८ वर पोहोचला आहे. याखेरीज दिलासादायक म्हणजे राज्यात आजपर्यंत २५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात मंगळवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे ११, पुण्यातील ४ तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे.जग : १.२४ लाख मृत्यूजगभरात कोरोना बळींची एकूण संख्या १ लाख २४ हजारांवर गेली असून, अमेरिकेतील मृतांचा आकडाच २३ हजार ७०० आहे. जगातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९.७९ लाखांहून अधिक झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत २० हजार ५००, तर स्पेनमध्ये १८ हजारांहून अधिक जण मरण पावले आहेत. ब्रिटनमध्येही मृतांची संख्या १२ हजारांवर गेली आहे. तिथे ९३ हजार ८७३ जण बाधित आहेत. कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या १९ लाख ४७ हजार रुग्णांपैकी आतापर्यंत ४ लाख ६० हजार जण उपचारानंतर बरे झाले असून, १३ लाख ६५ हजार रुग्णांवर विविध देशांतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यातील ५५ हजार रुग्णांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.देश : ११ हजार रुग्णगेल्या २४ तासांत १४६३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्याने देशातील रुग्णांची संख्या ११ हजार ४७६ झाली आहे. या २४ तासांत २९ जण मृत्युमुखी पडल्याने बळींचा आकडा ३७७ झाला आहे. आतापर्यंत सुमारे १२०० जण उपचारांमुळे बरे झाले आहेत आणि ९ हजार २७३ जणांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट, दिल्ली आणि तामिळनाडू या राज्यांत कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. देशभरात ६०२ इस्पितळे फक्त कोरोना रुग्णांसाठी राखीव आहेत. तिथे एकूण एक लाख सहा हजार ११९ ‘आयसोलेशन बेड’ व १२,०२४ ‘आयसीयू’ बेडची सोय केली आहे. आतापर्यंत २.३७लाख व्यक्तींच्या कोरोना चाचण्या आहेत. देशात ‘रॅपिड’ चाचण्यांसाठी ३७ लाख किट््स केव्हाही उपलब्ध आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूdelhiदिल्लीIndiaभारत