शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

साडेअकरा हजार जोडप्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य

By admin | Updated: July 11, 2014 00:36 IST

ज्ञानेश दुधाडे , अहमदनगर पुढारलेल्या नगर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत ११ हजार ४२४ जोडप्यांना तीन ते पाच अपत्य असल्याचे आढळून आले आहे.

ज्ञानेश दुधाडे , अहमदनगरपुढारलेल्या नगर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत ११ हजार ४२४ जोडप्यांना तीन ते पाच अपत्य असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, महिला आणि बालकल्याण विभागाच्या आकडेवारी वरून गेल्या तीन वर्षात विविध प्रयत्नामुळे मुलींचा जन्मदर ८१३ वरून मार्च २०१४ पर्यंत ९१८ पर्यंत नेण्यात यश आले आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या हा संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. सरकारकडून लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याला जिल्हा देखील अपवाद नाही. जिल्ह्यात नियंत्रित लोकसंख्येसाठी प्रचार, प्रसार आणि प्रसिध्दीसोबत आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात तांबी बसवणे, गर्भ निरोधक गोळ्या आणि निरोध वाटप करणे यांचा समावेश आहे. दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या जोडप्यांना सरकारकडून विविध सवलतीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. असे असतांना जिल्ह्यातील ७६ हजार १८७ जोडप्यांपैकी ८ हजार ४९ जणांना अपत्यच नसून एक अपत्य असणाऱ्या जोडप्यांची संख्या २९ हजार ८०४, दोन अपत्य असणाऱ्यांची संख्या २६ हजार ८०९, तीन अपत्य असणाऱ्यांची संख्या ८ हजार ६८२, चार अपत्य असणाऱ्यांची संख्या २ हजार १६७, पाच किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांची संख्या ६६५ एवढी आहे. जि. प. आरोग्य आणि महिला बालकल्याण विभाग यांनी विविध पातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत आहे. तीन वर्षापूर्वी २०११ ला जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर ८११ पर्यंत होता. त्यात तीन वर्षात वाढ होत, तो ९१८ पर्यंत पोहचला आहे. महिला बालकल्याण विभागाच्यावतीने गर्भसंस्कार, गरोदर मातांचे प्रबोधन, स्त्री जन्माचे स्वागत, बाळाचे जन्मापूर्वी उपाययोजना, माहेर प्रकल्प, जननी प्रकल्प, याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात स्त्री जन्माचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक स्त्री जन्मदर नेवासा ९८० आहे. त्या खालोखाल अकोले ९६५, कोपरगाव ९६१, शेवगाव ९४१, कर्जत आणि राहाता प्रत्येकी ९३४, नगर ९२३, जामखेड ९०६, संगमनेर ९०२, तर पारनेर, राहुरी, पाथर्डी,श्रीगोंदा आणि श्रीरामपूर या तालुक्यात हा आकडा ९०० च्या खाली आहे. मार्च २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत या जन्मदराचे प्रमाण ९१० होते.अपत्य नसणारे जोडपे- ८०४९एक अपत्य असणारे जोडपे- २९८०५दोन अपत्य असणारे जोडपे- २६८०९तीन अपत्य असणारे जोडपे- ८६९२चार अपत्य असणारे जोडपे- २१६७पाच पेक्षा जास्त अपत्य असणारे जोडपे- ६६५तालुकानिहाय स्त्री जन्मदराचे प्रमाणअकोले ९६५, संगमनेर ९०२, शेवगाव ९४१, कर्जत, राहुरी ८९३, श्रीरामपूर ८४६, नेवासा ९८०, जामखेड ९०६, नगर (ग्रामीण)९२३, पारनेर ८९८, पाथर्डी ८१२, श्रीगोंदा ८५०, कोपरगाव ९६१, राहाता ९३४ असे आहे.तांबी बसविणारे - १४०१३गर्भनिरोधक गोळ्या वाटप- १४४२१निरोध वाटप - १६९८८कुटुुंबकल्याण शस्त्रक्रिया पुरूष १२८कुटुुंबकल्याण शस्त्रक्रिया स्त्री २२४२१