अधिक जोमाने जनतेची सेवा करता येईल
By Admin | Updated: March 28, 2015 01:43 IST2015-03-28T01:43:47+5:302015-03-28T01:43:47+5:30

अधिक जोमाने जनतेची सेवा करता येईल
>शिवाजी जोंधळे : सनदी अधिकाऱ्याचा दर्जा मिळालाशिवाजी जोंधळे यांचा फोटो वापरवानागपूर : महाराष्ट्र लोकसेवेतील आठ अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने शुक्रवारी सनदी अधिकाऱ्याचा (आयएएस)दर्जा दिला आहे. शासनाच्या निर्णयावर समाधानी आहे. यामुळे अधिक जोमाने जनतेची सेवा करता येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली. सनदी अधिकाऱ्याचा दर्जा मिळालेल्या अधिकाऱ्यात जोंधळे यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र महसूल सेवेच्या १९८६ च्या उपजिल्हाधिकारी बॅचचे ते अधिकारी आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी मुख्य कार्यक ारी पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यापूर्वी ते मुंबई येथे विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष होते. १६ मार्चला त्यांच्याकडे नागपूर येथील अतिरिक्त आदिवासी आयुक्त पदाचाही पदभार सोपविण्यात आला आहे.त्यांच्या कार्यकाळात जि.प.मधील प्रलंबित योजनांची कामे मार्गी लागली. कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लागल्या आहेत. जिल्ह्यात इंदिरा आवास, वैयक्तिक शौचालय योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. इंदिरा आवास योजनेत राज्यात नागपूर जि.प.ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शौचालय योजनेतही राज्य चौथ्या क्रमांकावर आहे.(प्रतिनिधी)