अधिक मासानिमित्त बाजारपेठेत
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30
गर्दी

अधिक मासानिमित्त बाजारपेठेत
ग ्दी भिगवण : वषार्नुवर्षे चालत आलेली परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी अधिक मासातील धोंडा जेवणामुळे भिगवण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होत आहे. जावई पाहुण्याला वाण देण्यासाठी सराफी दुकानातील सोने चांदीला अधिक मागणी मिळत आहे.हिंदू प्रथेप्रमाणे जावयाला नारायणाचा आणि मुलीला लक्ष्मीचा मान देण्यात आला आहे .त्यामुळे जावयाची सेवा केल्याने लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होते,अशी धारणा असल्याने जावई बापू साठी धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. याच निमित्ताने वाण म्हणून देण्यासाठी चांदीचे ताट ,समई ,सोन्याची अंगठी तसेच कपडे खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत.या वर्षी आईने मुलीसाठी नवीन जोडवे करण्याची प्रथा आहे. तसेच लग्न सराईचा सिझन मोठ्या प्रमाणावर झाल्याने सराफ व्यवसाय करणार्यांची चांदी झाल्याची परिस्थिती बाजारपेठेत दिसून येत आहे. परिसरातील गावातून ग्रामस्थ दैनदिन जीवनातील वस्तूंच्या खरेदीसाठी भिगवणला येत असतात. त्यामुळे भिगवणची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल झालेली दिसून येते आहे. ------------------------शिल्लक बातमी